पीआरपीचा एल्गार

0

पीआरपीला विधानसभेकरिता जागा द्यावी अन्यथा लोकसभेेच्या प्रचारावर बहिष्कार –

भुसावळ :– पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे प्रचार न करण्याचा फतवा काढण्यात येवून झालेल्या बैठकीत पीआरपीला विधानसभेकरिता जागा द्यावी अन्यथा लोकसभेेच्या प्रचारावर बहिष्कार करुन प्रचार करणार नसल्याचा खनखणीत इशारा पीआरपिचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी दिला .तसेच कॉंग्रेस- राष्ट्रवादीने आजपर्यंत पीआरपी चा वापर करुन घेतला नसल्याचा -आरोपही यावेळी त्यानी केला.

गेल्या२० ते २५ वर्षांपासून पीपल्स रिपब्लीकन पार्टी सातत्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत असून वेळोवेळी निवडणुकीत सहकार्य करीत आलेली आहे. पीआरपीची ताकद जिल्ह्यात वाढली असल्याने येत्या २०१९ च्या विधानसभेकरीता भुसावळची जागा पीआरपीला सोडावी. अन्यथा लोकसभेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या जळगाव आणि रावेर येथे होणार्‍या प्रचार सभेत व्यासपीठावरसुद्धा चढणार नाही आणि प्रचारही करणार नाही, अशी ठाम भूमिका पीआरपीचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी घेतली आहे. लेखी आश्‍वासन मिळत नाही तोपर्यंत आमची भूमिका ठाम असणार आहे. रविवारी पीआरपीच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रविवार दिनांक २४ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी दिली.

पुढे बोलताना जगन सोनवणे यांनी सांगितले की, गत काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून संस्थापक अध्यक्ष शरद पवार, अजीत पवार यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून त्यांच्या सोबत ग्रामपंचायत ते लोकसभेच्या प्रत्येक निवडूकीत पीआरपी सोबत राहिली आहे. मात्र, जिल्ह्यात मागील गतकाळात विधानसभा असो की लोकसभा या निवडणूक प्रभावी भाषण करणयासाठी आणि सभा गाजवण्यासाठी पीआरपीचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणेंची आठवण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना येते. परंतु मागील पाच वर्षात जिल्ह्यात कष्टकरी, मुस्लीम, दलित बहुजन समाजबांधवांवर होणार्‍या अन्यायाला पीआरपीने विविध आंदोलनाच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. रविवारी पीआरपीच्या संपर्क कार्यालयात जिल्ह्यातील पदाधिकाी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्या बैठकीत कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार भुसावळ विधानसभेची जागा ही पीआरपीला सोडण्यात यावी अशी आमची ठाम भूमिका आहे. अन्यथा लोकसभेत जळगाव आणि रावेर येथील राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत आणि व्यासपीठावर आम्ही दिसणार नाही असेही सोनवणे यांनी सांगितले. राजकारणात कोणताच पक्ष कायमचा मित्र किंवा क्षत्रु नसतो आणि कोणताच राजकीय पक्ष अस्पृश्य नसतो याचे भान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी ठेवावे. अन्यथा आम्हाला वठणीवर आणायला वेळ लागणार नसल्याचाही इशारा त्यांनी दिला. पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्याशी बोलून आम्ही हा निर्णय घेतल्याचेही सोनवणे यांनी पत्रपरिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेला पीआरपी युवा जिल्हाप्रमुख राकेश बग्गन, ग्रामीण जिल्हाप्रमुख संतोष मेश्राम, राष्ट्रीय मजदूर सेना जिल्हाप्रमुख राजू डोंगरदिवे, मुस्लीम धर्मगुरु मौलाना अजीम, रमाई ब्रिगेड जिल्हाप्रमुख संगीता ब्राह्मणे ,हरीश सुरवाड़े, यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.