परळीत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची हत्या

0

मुंबई :- परळी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व विद्यमान नगरसेविकेचे पती पांडुरंग गायकवाड यांचा धारधार शस्त्राने वार करून निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज पहाटे झालेल्या या हल्ल्याने परळीत एकच खळबळ उडाली आहे.

माजी नगरसेवक असलेले पांडुरंग गायकवाड हे परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका मीनाबाई गायकवाड यांचे पती आहेत. परळी येथील रेल्वे उड्डाणपूलाखाली काल (रविवारी) रात्री अचानक काही जणांनी पांडुरंग गायकवाड यांच्यावर तलवारीने हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर वीस पेक्षा अधिक वार करण्यात आले. या भीषण हल्ल्यामुळे गायकवाड यांचा जगीच मृत्यू झाला. या जीवघेण्या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.