पावसाचे थैमान.. क्षणातच भलं मोठं घर कोसळलं (व्हिडीओ)

0

तिरुवनंतपुरम, लोकशाही न्यूज नेटवर्क  

परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. त्यामुळे काही ठिकाणी नद्यांना देखील पूर आले आहेत. अशातच केरळमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. यादरम्यान, केरळमधील एक भलं मोठं घर पाण्यात बुडालं. याचाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

शनिवारपासून केरळमध्ये सुरु असलेल्या पावसाने 24 जणांचा बळी घेतला आहे. यावेळी कोट्टायम जिल्ह्यातील कुट्टिक्कल इथं भूस्खलनामुळे एक घर थेट पाण्यात कोसळलं. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. बघता- बघता  भलमोठं घर पाण्याच्या प्रवाहांमध्ये कोसळलं.

या दुर्घटनेत संबंधित घरातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील तिघांचे मृतदेह काल स्थानिक लोकांनी बाहेर काढले. तर उर्वरीत तिघांचे मृतदेह बचाव पथकाने बाहेर काढले आहेत.

दरम्यान, केरळमध्ये मोठ्या प्रमाणात जीवीतहानी झाल्याने बचावकार्य सुरु आहे. यासाठी लष्कराच्या तुकड्या देखील पोहोचल्या आहेत. तसेच रविवारी पाऊस कमी झाला तरी भारतीय हवामान विभागाने 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.