पालकमंत्री ना. ग़ुलाबराव पाटलांसह कामगार सेनेची डीआरएम सोबत चर्चा

0
 भुसावळ (प्रतिनिधी)-येथिल रेल्वे प्रबंधक  कार्यालय येथे रेल्वे कामगारांच्या विविध व ज्वलंत समस्या संदर्भात  पालकमंत्री ग़ुलाबराव पाटिल यांनी  डीआरएम  गुप्ता  यांचे सोबत  आक्रमक चर्चा केली. ना .ग़ुलाबराव पाटिल यांनी डीआरएम गुप्ता यांना ठणकावून सांगितले की रेल कामगार सेनेच्या ज्या काही  समस्या असतील त्या काळजीपुर्वक लक्ष देवून लवकरात लवकर सोड़वाव्या .यावर डीआरएम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व येत्या काही दिवसात रेल कामगार सेनेला चर्चेसाठी बोलावेल असे आश्वासन दिले.प्रसंगी मा नगरसेवक मनोज बियाणी , रेल कामगार विभागीय अध्यक्ष ललित कुमार मुथा उपस्थित होते .
यावेळी रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललीत कुमार मुथा,प्रीतम टाक,प्रदीप भुसारे,विनोद वाघे,संजय जगन्नाथ चौधरी,नरेश शर्मा,विजय तायड़े,सुरेंद्र यादव,पदमानंद तायड़े , महेंद्र सोनवणे,महेश पाटिल,शेख शब्बीर,अब्दुल अजीज व इतर पदाधिकारी हजर होते

Leave A Reply

Your email address will not be published.