स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आयोजित पाठांतर स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

0

चाळीसगाव, प्रतिनिधी – रामकृष्ण मिशन आश्रम औरंगाबाद आयोजित स्वामी विवेकानंद यांच्या 157 व्या जयंतीनिमित्त युवा सप्ताह अंतर्गत तालुकास्तरीय पाठांतर स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांचा चांगला उस्फुर्त प्रतिसाद लाभला रामकृष्ण मिशन आश्रम औरंगाबाद तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय आंतरशालेय पाठांतर स्पर्धांचे आयोजन नुकतीच आ . बं. मुलांचे हायस्कूल येथे करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन आ. बं. मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक के. एन. तडवी उपमुख्याध्यापक बी. बी. सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी वरिष्ठ लिपिक रमेश रोकडे व मिलिंद देव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश जानराव यांनी केले. स्पर्धेसाठी तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदविला होता. पाठांतर स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या पाठांतर स्पर्धे सोबतच स्वामी विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद बद्दलचे माझे मत या विषयावर उस्फुर्त विचार व्यक्त केले. आंतरशालेय स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी लहान गट- (प्रथम) प्रार्थना पंकज दायम आ. बं. गर्ल्स हायस्कूल (द्वितीय) वैष्णवी सदाशिव पिलोरे मा. वि.तरवाडे (तृतीय) रोहित अनिल पाटीलआ. बं. मुलांचे हायस्कूल उत्तेजनार्थ (१) गायत्री श्रावण पावले मा. वि. तरवाडे २ कीर्ती भाईदास पाटील मा. वि. बेलगंगा नगर मोठा गट– (प्रथम) विशाल मनोहर पाटील मा. वि. तरवाडे (द्वितीय) तेजल विलास कोकाटे राष्ट्रीय कन्या शाळा (तृतीय) सायली सतीश कासार राष्ट्रीय कन्याशाळा उत्तेजनार्थ १ जागृती रामकृष्ण चौधरी मा.वि. तरवाडे २ रितुल विनोद पाटील मा. वि. तांदुळवाडी स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून संगीता देव, एल. डी. पाटील, कामिनी मुसळे, डि.के. चव्हाण यांनी काम पाहिले तरी यशस्वितेसाठी चेतन कुऱ्हाडे, हेमंत साळी आदींनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.