पारोळ्यातून दोन बसेस मजूर घेऊन मध्यप्रदेश कडे रवाना

0
पारोळा (प्रतिनिधी) सध्या कोरोना ने जगभर हाहाकार माजविला असताना देशभरातून गाव सोडून गेलेले मजूर,व्यावसायिक आदि जण लोकडाऊनच्या काळात मुंबई, पुणे, सुरत, नाशिक, आदी ठिकाणी अडकले असताना त्यांना त्या ठिकाणी रोजगार नाही खाण्यापिण्यासाठी,अन्न धान्य, पैसा नाही ते मजूर वर्ग मुंबई, पुणे, ठाणे, येथून थेट पायी निघून येताना दिसून येत असताना महाराष्ट्र शासनाने लालपरी बस ही मोफत सेवा देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज प्रथमच पारोळा येथून दोन बसेस मध्ये मुंबईहून आलेले चौरेचाळीस मजुरांना मध्यप्रदेश च्या सीमेपर्यंत पोहोचविण्यात आले. यावेळी तहसिलदार अनिल गवांदे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश साळुंखे, डॉक्टर चेतन महाजन, डॉक्टर राजेश वालडे, डॉक्टर निखिल बोरा, मंडळाधिकारी बीएस अकोलनेरकर, जी एस पाटील, पी एल काळे, पारोळा बस स्थानक प्रमुख बी एन वाघ, वाहतूक नियंत्रक माधवराव पाटील, एल वाय सोनवणे, व कर्मचारी उपस्थित होते.
आज सकाळी बसस्थानक व महसूल विभागाने परराज्यातील पायी व सायकलींवर जाणाऱ्या मजुरांना कुटीर रुग्णालयात आणून त्यांची तपासणी करून अमळनेर डेपोच्या बस क्रमांक एम एच 20 बी एल 31 47 चालक आर.पी बाविस्कर, बस क्रमांक एम एच 20 बी एल 2402 चालक विनोद जे पाटील यांनी प्रत्येकी बसमध्ये 22 प्रवासी असे एकूण 44 प्रवासी बसवून महाराष्ट्र मध्यप्रदेशच्या सीमेवरील मुक्ताईनगर कर्की गावाच्या बस स्थानकापर्यंत मजुरांना सोडण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.