कोरोना युद्धात लोकप्रतिनिधी म्हणून उत्तम व क्रियाशील भूमिका असणाऱ्या आ.अनिल पाटलांचे ग्रामिण भागात कौतुक

0
अमळनेर-कोरोना सारख्या भयंकर विषाणू ने अमळनेरात वाढता कहर केलेला असताना यावर मात करण्याच्या प्रक्रियेत लोकप्रतिनिधी म्हणून आ.अनिल पाटील यांची उत्तम,क्रियाशील व धाडसी अशी पदाला साजेशी भूमिका असल्याने शहरासह ग्रामिण भागात जनतेच्या वतीने त्यांचे कौतुक होत आहे.याचा प्रत्यय तालुक्यातील बाह्मणे गावी नुकताच आला.
          आ.अनिल पाटील हे पांझरा नदीत अक्कलपाडा धरणातून पाणी सोडल्यानंतर याचे पाणी अमळनेर तालुक्याच्या हद्दीत पोहोचल्यावर जलपूजन करण्याच्या निमित्ताने मुडी परिसरात गेले असता अनेक गावांत ग्रामस्थांनी त्यांना थांबवून या संकटात ते घेत असलेल्या भूमिकेचे कौतुक केले.बाह्मणे तर त्यांचे आगमन होताच गावातील पुरुष व महिलांनी सोशल डिस्टनसिंग ठेवत एकत्र येऊन टाळ्यांच्या गजरासह फुल टाकून त्यांचे स्वागत केले.एवढेच नव्हे तर असंख्य महिलांनी ओवाळत औक्षण देखील केले.सुरवातीला हा काय प्रकार आहे हे आमदारांच्या लक्षातच आले नाही जलपूजन साठी आमदार गावाकडून येणार एवढीच माहिती ग्रामस्थांना असल्याने त्यांनी हे स्वागत केले.उत्सुकतेने आमदारांनी याचे कारण विचारले असता ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की कोरोनाने आपल्या देशाला व राज्याला घायाळ केले असून अमळनेर येथेही हे संकट आले असताना आपण गावोगावच्या लोकप्रतिनिधी प्रमाणे स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी केवळ ऑनलाइन भूमिका न दाखवीता प्रत्यक्ष लढाईच्या मैदानात उतरून प्रशासनास योग्य मार्गदर्शन केले.प्रत्येक ठिकाणी स्वतः उपस्थिती देत जनतेला धीर दिला.ग्रामिण भागात मुंगसे येथे पहिला बाधित रुग्ण सापडला असताना क्षणाचा विचार न करता त्या गावासह चारही गावे गाठून ग्रामस्थांना धीर देत त्यांच्या मनातून भीती केली.एकंदरीत शासनाचे प्रतिनिधी म्हणून एक पालक या नात्याने जी भूमिका घेतली पाहिजे त्यापेक्षा अधिक पटीने या महामारीत आपले काम असल्याने आपण सत्कारास आणि कौतुकास पात्र असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.या आगळ्यावेगळ्या सत्काराने आमदारांनी देखील भारावून जात मी जे करतोय ते माझे कर्तव्यच असून जिथे जनता संकटात तिथे तुमचा भूमिपुत्र आमदार त्यांच्यासोबतच असेल अशी ग्वाही देत आभार व्यक्त केले.
            याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच प्रविण ओंकार पाटील, धर्मराज पाटील, विजय लोटन पाटील, राजेंद्र पाटील, भिकन बारीकराव पाटील, रमेश विनायक पाटील, महेश पाटील,
हर्षवर्धन गणेश भामरे, रविंद्र मिस्तरी, मोतीलाल बाजीराव पाटील, दत्तात्रय पाटील, सुनिल पाटील, किशोर हिम्मतराव पाटील, शरद पाटील, सुनिल मन्साराम पाटील, महेंद्र पाटील, देविदास नेरकर, उदय आधार पाटील, भैया पाटील, संजय पाटील, प्रकाश पाटील, नवल पाटील, अमृत देविदास पाटील, विश्वास भगवान पाटील, कैलास युवराज पाटील, दिनेश पाटील, प्रमोद पाटील, शुभम पाटील, तुषार पाटील, जगदीश नाथबुवा, नितीन पाटील, पुंडलिक संभु पाटील, मयूर नेरकर, गुणवंत पाटील, विनोद नेरकर, प्रदीप पाटील, मयूर पाटील, राज किशोर पाटील, आदित्य बागले व गावातील लहान बाल गोपाळ व ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.