पारोळा लोकअदालतीत 53 प्रकरणे निकाली, साडे तेरा लाखांची वसुली

0

पारोळा-
येथील न्यायालयात तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रीय लोकदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रलंबित, वादपूर्व,व दिवाणी फौजदारी असे एकूण 1134 प्रकरण सादर करण्यात आले होते 53 प्रकरणं निकाली काढून सुमारे 13 लाख 32,017 रुपयांची वसुली करण्यात आली.
यावेळी न्यायधिश आनंदराव भडके,न्या पी जी महाळंकर हे अध्यक्षस्थानी होते. तर पॅनल पंच म्हणून अँड आर टी पाटील,अँड पराग शिरसमने हे होते वकील संघाचे अँड अनिलकुमार देशपांडे,अँड आनंदराव पवार, अँड ए आर बागुल,अँड एम एस पाटील,अँड भुषण माने,अँड अशोक कश्यप,अँड ए डी पाटील,सरकारी वकील रमाकांत पाटील,अँड स्वाती शिंदे,वेदव्रत काटे,सतीश पाटील,गणेश मरसाडे, सत्यवान निकम,सचिन पाटील,अकील पिंजारी,प्रशांत ठाकरे,विशाल महाजन आदी उपस्थित होते. सकाळी न्यायधिश व मान्यवरांच्या हस्ते या लोकदालतीचे न्यायदेवतेचे पूजन करून शुभारंभ करण्यात आला. वादपूर्व प्रलंबित प्रकरणात 1025 पैकी 27 प्रकरणे निकाली काढून चार लाख 16 हजार आठशे बावीस रुपये वसुली करण्यात आली.
लोकअदालत यशस्वीतेसाठी सहा अधीक्षक हेमंत बडगुजर,लघु लेखक पी टी पाटील,वरिष्ठ लिपिक बी एस पांडव,आर एन मुकुंदे,गिरीश पाटील,कनिष्ठ लिपिक व्ही आर ठाकूर,जे टी चंद्रात्रे, एम आर खैरनार, पी जी सोनवणे, ए जी पाटील,व्ही बी पवार,ए पी कुलकर्णी, रविंद्र आर माळी,पंडित पाटील,हे कॉ मच्छीन्द्र भारती,हे कॉ प्रमोद पाटील यासह वकील संघ व कर्मचाऱयांनी परिश्रम घेतले……

Leave A Reply

Your email address will not be published.