गिरणेच्या तिसर्‍या आवर्तनाचा कालावधी एक-दोन दिवसांनी वाढवण्याचे संकेत

0

एरंडोल-
सध्या गिरणा नदीला सोडण्यात आलेल्या तिसर्‍या आवर्तनाच्या कालावधीत एक दोन दिवसाची वाढ होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत 2 हजार द. ल.घ.फू प्रति सेकंद पाण्याचा सुरू आहे.
सध्या तापमान वाढल्यामुळे गिरणा नदीपात्रात वाहत असलेल्या पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे आवर्तनाच्या पाण्याचा वेग पूर्ण क्षमतेने पाणी सोडून देखील कमी झाला आहे.
या पार्श्वभूमीवर तिसर्‍या आवर्तनाचा कालावधी एक-दोन दिवसाने वाढवण्याची शक्यता आहे दरम्यान पाण्याची चोरी होऊ नये म्हणून गिरणा धरणापासून ते कानळदा गावापर्यंत वेगळ्या स्वरूपात पथके स्थापन करण्यात आली आहेत गिरणा नदी काठावरील कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याविषयी वीज वितरण यंत्रणेला कळविण्यात आले आहे एकंदरीत पाटबंधारे विभागा मार्फत कमीत कमी पाणी वापर होईल याविषयी दक्षता घेण्यात येत आहे अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.