पारोळा लोकदालतीत ५३ प्रकरणे निकाली, साडे तेरा लाखांची वसुली

0

पारोळा | प्रतिनिधी
येथील न्यायालयात तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रीय लोकदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रलंबित, वादपूर्व,व दिवाणी फौजदारी असे एकूण ११३४ प्रकरण सादर करण्यात आले होते ५३ प्रकरणं निकाली काढून सुमारे १३ लाख ३२,०१७ रुपयांची वसुली करण्यात आली.
यावेळी न्यायधिश आनंदराव भडके,न्या पी जी महाळंकर हे अध्यक्षस्थानी होते. तर पॅनल पंच म्हणून अँड आर टी पाटील,अँड पराग शिरसमने हे होते वकील संघाचे अँड अनिलकुमार देशपांडे,अँड आनंदराव पवार, अँड ए आर बागुल,अँड एम एस पाटील,अँड भुषण माने,अँड अशोक कश्यप,अँड ए डी पाटील,सरकारी वकील रमाकांत पाटील,अँड स्वाती शिंदे,वेदव्रत काटे,सतीश पाटील,गणेश मरसाडे, सत्यवान निकम,सचिन पाटील,अकील पिंजारी,प्रशांत ठाकरे,विशाल महाजन आदी उपस्थित होते. सकाळी न्यायधिश व मान्यवरांच्या हस्ते या लोकदालतीचे न्यायदेवतेचे पूजन करून शुभारंभ करण्यात आला. वादपूर्व प्रलंबित प्रकरणात १०२५ पैकी २७ प्रकरणे निकाली काढून चार लाख १६ हजार आठशे बावीस रुपये वसुली करण्यात आली.
                                                                                                                                     उर्वरित उद्याच्या अंकात…

Leave A Reply

Your email address will not be published.