पारोळा लॉक डाऊन असतांनाही . शासनाच्या आदेशाला नागरिकांन कडून हरताळ .

0
पारोळा–
संपूर्ण जगात हाहाकार माजवणर्या कोरोना वायरस ने आपल्या देशात ही पाय पसरायला सुरुवात केली आहे  त्यातच आपल्या महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त रूग्ण आढळून आले असल्याची  बातमी हाती येत आहे . या साठीच संपूर्ण महाराष्ट्रात लाॅकडाऊन केले मात्र याचे काही लोक गांभीर्याने विचार न करता झुंडी च्या झुंडी ने बाजार पेठेत येऊन गर्दी करीत असताना दिसत आहेत, दिनांक २३ रोजी सकाळ होताच बाजारपेठेत जिकडे तिकडे गर्दी दिसू लागली होती . असे जाणवत होते  की शासनाच्या आदेशाला नागरीकांन कडून हरताळ फासल जात असल्याचे चित्र दिसून येत आहे, या बाजारपेठेतील गर्दी वर जर नियंत्रण करायचे असेल तर जिवनाअवश्यक वस्तूची दुकाने यांना सुध्दा टाइम टेबल चे बंधन घालून देण्यात यावेत असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत, अशी मागणी केली जात आहे, तर ज्या गोष्टी ची खरोखरच गरज आहे  त्यांनाही वेळेच्या मर्यादा घालून द्याव्यात व त्यांना ही सक्ती ने त्यांची अमलबजावणी करण्यास कडक नियम लागू करावेत तरच ही परिस्थिती आटोक्यात येण्याची शक्यता आहे
.. बाजारपेठेवर बंधने घाला ..संचारबंदी नंतर ही बाजार पेठेत गर्दीच-
पारोळ्यातील भाजी – बाजार मध्ये आज सकाळी तसेच संध्याकाळी संचारबंदी लागू झाल्यानंतर ही पारोळा बाजार पेठेत गर्दी वर कोणत्याही प्रकारे फरक पडल्याचे जाणवत नव्हते, खरेदीदारांची गर्दी नेहमी पेक्षाही जास्त गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत होते . मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांनी विक्रेत्यांना सुचना देऊन ही काहि एक फायदा होत नसल्याचे दिसुन येत होते . कोरोना ने सर्वत्र धुमाकूळ घालत असताना शहरवासिये याची गांभीर्यानी दखल घेत नसल्याने भाजी -बाजार भरण्यासाठी वेळेचे बंधन घालण्यात आले तरच कोरोना ला आळा घालण्यात आपण सर्व यशस्वी होऊ असं जाणकारांचं मत आहे .
—आम्हाला ही कोरोना वायरस चा धाक— व्यापारी
सध्या जिवनाअवश्यक वस्तूची दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश सरकार ने दिले आहेत परंतु या ठिकाणी ही नेहमी पेक्षा जास्त गर्दी केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे, यातच काही व्यापाऱ्यांनी आपली व्याथा मांडत मत व्यक्त केले की नाईलाजास्तव आम्हाला ही आता या संसर्गजन्य रोगांची भिती वाटु लागली आहे कोन व्यक्ति कोणत्या रूपाने आमच्या दुकानात येईल हे सांगता येत नाही, या पुढे आम्हाला ही काही नियम व बंधन घालण्यात यावेत जेणेकरून आम्ही ही वेळेत आपले व्यवहार पुर्ण करू व आम्ही या संसर्गजन्य रोगापासून स्वताची सुरक्षा करू,

Leave A Reply

Your email address will not be published.