पारोळा येथे नगरपालिकेकडून ७६८ गणेश मूर्तीचे संकलन

0

 पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पारोळा शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जन रात्री १० वाजेपर्यंत सर्वत्र शांततेत करण्यात आले. या वर्षी पारोळा नगराध्यक्ष करण पाटील यांच्या संकल्पनेतून शहरात विविध ठिकाणी ११ मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आली होती. या संकलन केंद्रावर ७६० घरगुती गणेश मूर्ती, ८ सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती  स्विकारण्यात आल्या. या सर्व गणेश मूर्तीचे महावीर कॉलनी येथील  तलाव या ठिकाणी रात्री ८ वाजेपर्यंत निर्विघ्नपणे विसर्जन करण्यात आले.

कोरोनाच्या काळात गणेश भक्तांचे श्री गणेशाच्या विसर्जनासाठी धावपळ व गैरसोय होऊ नये, यासाठी नगराध्यक्ष करण पवार व मुख्याधिकारी ज्योती भगत  यांनी शहरातील गणपती विसर्जनासाठी गणपती मूर्ती संकलन केंद्र शहरात एकूण ११ संकलन स्थळ उभारण्यात आले. यासाठी सकाळी न. पा. च्या वतीने सजावट केलेल्या ट्रक्टरांची महिला व बालकल्याण सभापती अंजली पवार यांच्याहस्ते विधीवत पुजा करून न. पा. चे  सर्व संकलन केंद्रावर पाठवण्यात आले.

यात डी. डी. नगर, बोहरा सेंट्रल स्कूल, सानेगुरुजी कॉलनी, कासार गणपती चौक, न. पा.चौक, आझाद चौक, अमळनेर रोड चैफुली, तांबे नगर, गोडबोले गल्ली, कजगाव रोड, या सर्व ठिकाणी नपाच्या वतीने २ मंडप, २ टेबल, खुर्च्या , दोन न.पा. कर्मचारी, होमगार्ड, असा बंदोबस्त संकलन केंद्रावर देण्यात आला होता. या सर्व ११ संकलन केंद्रावर संकलित झालेल्या मूर्ती  सजावट केलेल्या ४ ते ५ ट्रॅक्टरच्या द्वारे जमा  करून या सर्व मूर्तींची विधीवत पूजा करून महावीर नगर येथील तलावात विसर्जित करण्यात आल्या.

या तलावात तरफ्याची  व्यवस्था करण्यात आली होती. तरफ्यावर मूर्त्या ठेवून त्या तलावाच्या मध्यभागी नेऊन मग विसर्जन करण्यात येत होत्या. तलावाच्या ठिकाणी बॅरिकेटिंग, होडी लायटिंग, मंडप, पुरोहित, या सर्वांची व्यवस्था पारोळा नगर पालिकेच्या वतीने  करण्यात आली होती.

काही मोठ्या सार्वजनिक मंडळाच्या सदस्यांनी थेट विसर्जन स्थळी आपल्या मंडळाच्या गणपती बाप्पाच्या मूर्ती विसर्जनासाठी आणल्या होत्या. सर्वानी शिस्तबद्ध पद्धतीने गणेश विसर्जन केले. या साठी पारोळा पोलिस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गणपती बाप्पाचे विसर्जन शांततेने व्हावे, यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार, उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील, सर्व नगरसेवक, नगरसेविका, पोलीस प्रशासन, नगर पालिका कर्मचारी,  कार्यालयीन अधिक्षिका, संघमित्रा संदनशिव, अभिषेक काकडे, योगेश तलवारे, पंकज महाजन, संदीप साळुंके, राहुल साळवे, कुणाल सौपुरे, टी.डी. नरवाडे, हिंम्मत पाटील, किशोर चौधरी, अशोक लोहार, संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.