पारोळा येथे दै.लोकशाहीच्या ‘लोकारोग्य’ दिवाळी अंकाचे उत्साहत प्रकाशन

0

विषेश बाब म्हणजे सर्व मान्यवारानी तोंडाला माॅस्क लाऊनच दिली हजेरी

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा येथे आज रोजी दैनिक लोकशाही च्या दिवाळी अंक लोकारोग्य चे एका छोटेखानी कार्यक्रमात उत्साहात प्रकाशन करण्यात आले.

याबाबत अधिक असे सालाबाद प्रमाणे यावर्षीही दैनिक लोकशाही च्या दिवाळी अंक पुस्तक स्वरूपात प्रकाशित झाले आहे,या दिवाळी अंकाचे पारोळा येथे बाॅम्बे बुट हाॅऊस येथे मान्यवरांच्या हस्ते एका छोटेखानी कार्यक्रमात मोजक्या लोंकाच्या उपस्थित प्रकाशन करण्यात आले या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवंरा सहित सर्वानी तोंडाला मास्क लावुनच हजेरी लावली याप्रसंगी

पारोळा वकिल संघटनेचे अध्यक्ष अॅड,तुषार पाटील, पारोळा येथिल आदर्श शिक्षक स,ध,भावसार,जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील,महेश मेगा मार्ट चे आधारस्तंभ किशनचंद हिंदुजा,जळगाव जिल्हा ग्रामिण पत्रकार संघचे अध्यक्ष भिकाभाऊ चौधरी,पारोळा कुटीर रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी योगेश सांळुखे, पारोळा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष केशव क्षत्रीय,पारोळा काॅग्रेचे तालुका अध्यक्ष पिरन अनुष्ठाण,दैनिक लोकशाही प्रतिनिधी अशोककुमार लालवाणी यांचे पिताश्री नारायणदास लालवाणी,

नामदेव(बाबा) माहाजन,राजकुमार नागदेव,रमेश बडगुजर,संजय चौधरी,आधि मान्यवर उपस्थित होते,यावेळी आदर्श शिक्षक स, ध,भावसार यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले,

दैनिक लोकशाहीचा लोकारोग्य

दिवाळी अंक २०२० पाहिला नि वाचला. त्या त्या वर्षांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार दिवाळी अंक काढणे ही दैनिक लोकशाहीची उत्तम प्रथा ! मागील वर्षी भीषण पाणीटंचाई लक्षात घेऊन ‘ जलसंपत्ती ‘ तर या वर्षी कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर लोकरोग्य ‘ अंक !

१०४ पानी अंकात तब्बल ५० पाने कोरोना संबंधी माहितीपर ६ लेख आहेत. या सहा ही लेखातून कोरोनाचा शिरकाव फैलाव नियंत्रणासाठी उपाययोजना या विषयी परामर्श तसेच प्रबोधनात्मक व मार्गदर्शक विवेचन आहे. शासकीय आरोग्य यंत्रणा रुग्णालये, सेवाभावी संस्था व कोरोना योद्धा यांच्याही कार्याचा आढावा व यथोचित उल्लेख आहे.

दिवाळीच्या फराळाबरोबर साहित्यिक मेजवानी हवीच ! हेही पथ्य अंकात पाळण्यात आले आहे कथा, कविता,लेख सर्वच दर्जेदार असून वाचनीय आहेत ‘कोरोना बाम्ब’ च्या वर्षा परगट यांच्या चारोळ्या आणि ‘ शाब्बास पठ्ठे ‘ डॉ आशिष विखारचे कार्टून्स प्रत्येक पानावर असणं हे खास वैशिष्ट्य !

वास्तवतेवर व्यंग व विनोद वाचकांना हसायला भाग पाडतात ! या शिवाय इसवी सन २०२१च १२ ही राशींचे संपूर्ण राशीभविष्य आहेच !

अंतरंगाबरोबर अंकाचे बाह्यांग देखील सुंदर आहे. पांढराशुभ्र कागद, उत्कृष्ट मांडणी, उत्तम छपाई रंगीत छायाचित्रे सर्वच आकर्षक ! थोडक्यात हा अंक म्हणजे ” मूर्ती लहान पण किर्ती महान ” असाच आहे !

संपादक,मालक,प्रकाशक,मुद्रक,लेखक,कवी, प्रतिनिधी,वार्ताहर, जाहिरातदार वर्गणीदार व रसिक वाचकांचे‌ मनापासून आभार !

पारोळा येथील प्रतिनिधी अशोक लालवाणी यांनी छोटेखानी कार्यक्रमाचे निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत या दिवाळी अंकाचे दिमाखात प्रकाशन केले त्यांना मनापासून धन्यवाद ! त्यांचेसह दैनिक लोकशाही वृत्त पत्रास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ! अश्या शब्दात शुभेच्छा दिल्या आलेल्या प्रत्येक मान्यवरांनी दैनिक लोकशाही च्या दिवळी अंकाचे तोंडभरून कौतुक केले,

याप्रसंगी प्रथम दैनिक लोकशाही च्या वतीने प्रत्येक मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले,तर शेवटी आलेल्या सर्व मान्यवरांचे अशोककुमार लालवाणी यांचे सुपुत्र विक्रम लालवाणी यांनी आभार मानले, व सदैव आपले प्रेम व सदिच्छा दैनिक लोकशाही वर राहु द्या असे सांगुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली,

Leave A Reply

Your email address will not be published.