धनाजी नाना महाविद्यालय येथे संविधान दिवस उत्साहात साजरा

0

 फैजपूर – फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी  नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व  विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 26 नोव्हेंबर 2020 रोजी संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी होते. त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले व संविधानाचे पूजन केले.

राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ ताराचंद सावसाकडे यांनी संविधान निर्मिती ची प्रक्रिया आणि वैशिष्ट्ये विशद करून उपस्थित सर्वांना संविधान रक्षणाची शपथ दिली.

याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी भारतीय संविधानाची महती सांगत प्रत्येक भारतीयाने आपल्या संविधानाचा बारकाईने अभ्यास करून आपले हक्क व कर्तव्य जाणून घ्यावेत आणि समाजाला व देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सहयोग द्यावा असे आवाहन केले. या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ नितीन चौधरी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा शेरसिंग पाडवी तसेच महिला कार्यक्रमाधिकारी डॉ सरला तडवी व महाविद्यालयातील प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हजर होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थिनी खुशबू पाटील हिने केले.

Leave A Reply

Your email address will not be published.