पारोळा येथे गर्दी नियत्रंणासाठी मुख्याधिकारी बाजारात ; १२ हजाराचा दंड वसूल

0

पारोळा (प्रतिनिधी) :  अक्षय तृतीया व रमजान सारखे दोन मोठे सण असल्याने शहरातील बाजार पेठेत गर्दी वाढली आहे,त्यामुळे अनेक ठिकाणी कोरोना चा विसर पडल्याचे चित्र दिसत असल्याने पारोळा येथिल कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी ज्योती भगत (पाटील)यांनी स्वता बाजारात उतरुन पाहाणी केली असता अनेक ठिकाणी गर्दी दिसुन आली, अचानक मुख्यअधिकारी आपल्या ताफ्यासह बाजारात दाखल झाल्याने अनेकांची धावपळ झाली,तर आज पासुन जिल्हाअधिकार्यांच्या आदेशा ने आत्यअवश्यक सेवेतील दुकानासाठी सकाळी ७ ते १२ पर्यंत ची वेळ होती.

परंतु याबाबत माहिती न असल्याने अनेक किराणा दुकानदारांनी अकरा वाजताच आप आपली दुकाने  बंद केली,अचानक पटापट दुकाने बंद होत असल्याचे पाहुन ग्राहाकांनी ही बाजारातुन काढता पाय घेतल्याने सकाळी अकरा वाजताच बाजारपेठ ओस पडले,तर मुख्यधिकारी यांनी  माहिती देत सांगीतले कि अनेक दुकानावर सोशल डिस्टंड न आढल्याने आज रोजी दुकानदांरा वर  कारवाई करुन बारा हजार रुपये  दंड वसुल करण्यात आला तर यापुढे सोशल डिस्टंड न पाळल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पारोळा मुख्यधिकारी ज्योती भगत यांनी दिली यावेळी न,पा कर्मचारी किशोर चौधरी,अभिजित काकडे,राहुल साळवे,नरवाडे,विजु,मोतीलाल महाजन, पारोळा पोलीस स्टेशनचे सुनिल सांळुखे,यांनी परिश्रम घेत ही कारवाई केली ,

सोशल डिस्टन्टींगचे पालन करत आपले व्याहार व्यापार करा दुकाना समोर एका वेळेस पाच च ग्राहाकांना उभे करा तसेच येणार्या प्रत्येक ग्राहाकाला मास्क वापरायचे सांगा, तसेच नागरिकांनी ही खरेदीसाठी बाजारात जाताना वाहानाचा वापर टाळावा,बाजारात गर्दी न करता जवळच्या दुकानातुन खरेदी करावी,शासन प्रशासनास सहकार्य करा,

– श्रीमती ज्योती भगत पाटील

मुख्याधिकारी पारोळा

Leave A Reply

Your email address will not be published.