पारोळा बसस्थानक येथे १२ तोळे सोन्याची चोरी

0

पारोळा  (प्रतिनिधी) : पारोळा येथिल बसस्थानकात रविवारी एका महिलेच्या पर्स मधुन १२ तोळे सोने चोरीस गेल्याची घटना घडली,

याबाबत अधिक माहिती अशी कि रविवार दि,२० रोजी दुपारच्या सुमारास विजयाबाई पवार व त्यांचे पती साहेबराव पवार रा,कल्याण  हे पारोळा येथुन बेटावद ला जाण्यासाठी अमळनेर कडे जाणार्या बस मध्ये चढले बस मध्ये चढले असता त्यांच्या लक्षात आले कि कोणीतरी आपली पर्स मधिल दागिणे ज्या मध्ये एक रानी हार,लकी हार,झुमके, डायमंड व रोख रक्कम संपुर्ण तीन लाख ८५ हजाराचा मुद्देमाल चोरून नेले असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने,त्यानी वाहकास ही बाब सांगीतली असता बस मध्ये उपस्थित सर्व प्रवाशांची झडती घेण्यात आली परंतु मुद्देमाल मिळुन न आल्याने  त्यांच्या फिर्यादी वरून पारोळा पोलिस स्टेशन ला गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पारोळा पोलिस करित आहेत,

Leave A Reply

Your email address will not be published.