पारोळा तालुक्यात शंभर टक्के लसीकरणाला सुरुवात

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्हाधिकारी जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांच्या आदेशान्वये कोरोना आजाराची संभाव्य तिसरी लाट पाहता व ओमायक्रोन विषाणूचा धोका लक्षात घेऊन तहसीलदार पारोळा गट विकास अधिकारी पारोळा तसेच पारोळा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आज पासून दोन दिवस महालसीकरण मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे.

यासाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार करून सर्व पात्र लाभार्थ्यांना covid-19 लसीच्या पहिला व दुसरा डोस देऊन पारोळा शहर 100% लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे आरोग्य अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सांगितले.

शासनाच्या आदेशानुसार  पारोळा शहरासह  तालुक्यात 100% लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून आज दिनांक १० पासुन  पारोळा शहरातील शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे, याची सुरुवात आज सकाळपासून करण्यात आली.  हर घर दस्तक म्हणून असलेले शासनाच्या नियोजना नुसार शहरातील प्रत्येक घरात जाऊन लस देण्याचे काम आज येथील कुटीर रुग्णालय कर्मचारी व त्यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी नगरपालिका कर्मचारी यांनी मिळून आज पासून संपूर्ण शहर शंभर टक्के लसीकरण करण्यास सुरुवात केली.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी, डॉ. योगेश साळुंखे, राखी बडगुजर, विनय कुमार कांबळे, मंगला पाटील, दिलीप तायडे, सुनिता मोरे, हेमंत आखाडे, डॉ. ज्ञानराज कुमावत, विशाल शिरोळे, डॉ. विजय पाटील, धनंजय वाघ, सुनील गायकवाड, अक्षय हटकर, डॉ. कल्पेश गरुड, महाजन डॉक्टर,  संदीप महाले, शुभम महाजन, चेतन पाटील, संगीता भीमराव पाटील, किरण पाटील, देवयानी शिंदे, संकेत पाटील, राहुल पवार, हर्षल पाटील, तुषार पाटील, अभिजीत मुदांणकर, निकिता आढाव, चेतन पाटील, कमलेश सोनवणे, सुनिता मंढोळे, राजू बारी, शुभांगी गढरी, लालसिंग पवार,  यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

ही लसीकरण मोहीम दोन दिवस चालणार आहे, तरी याचा फायदा जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आव्हान कुटीर रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.