पाचोरा महाविद्यालयात नॅक पुर्नमुल्यांकनासाठी सज्ज

0
पाचोरा  प्रतिनिधी
 पाचोरा तालुक्यातील सहकारी शिक्षण संस्थेचे श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दि
 १२ व १३ फेब्रुवारी २०२० रोजी बेंगलोर येथील न्यायसंस्थेच्या तज्ञ साहित्यांचे महाविद्यालयाच्या मूल्यांकनासाठी प्रत्यक्ष भेट देत आहे. यासाठी महाविद्यालयाची तयारी चांगल्या पद्धतीने पूर्ण झाली आहे. सदर समिती ही महाविद्यालयाच्या विविध विभागांना प्रत्यक्ष भेट देऊन मूल्यांकन करणार आहे. महाविद्यालयात विद्यावाचस्पती (पीएच.डी.) संशोधनासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी व इतिहास या विषयांच्या मार्गदर्शन सुविधा आहेत. महाविद्यालयात कला शाखेत मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, संगणकशास्त्र, गणित व वाणिज्य हे विषय शिकवले जातात. तसेच महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, युवती सभा, कमवा व शिका योजना, विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. महाविद्यालयातील ग्रंथालय हे ६१ हजार क्रमिक व संदर्भ ग्रंथांनी सुसज्ज आहे. त्याबरोबरच महाविद्यालयाच्या भव्य क्रिडांगणावर क्रिकेट, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो हे मैदानी खेळ खेळले जातात. यावर्षी महाविद्यालयाच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. महाविद्यालयात ग्रामीण व शहरी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या हितासाठी आवश्यक त्या सोयी – सुविधा, शिष्यवृत्त्या आर्थिक मदत केली जाते. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना चांगल्या तऱ्हेने प्रोत्साहन मिळते.      महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांना युवारंग व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी केले जातात. विद्यार्थ्यांच्या साहित्य गुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयात वकृत्व, निबंध, पोस्टर लेखन, काव्यवाचन यासारख्या विविध स्पर्धांसोबतघ वार्षिक “अंकुर” नियतकालीन काढले जाते. ग्रामीण शिक्षणाचे केंद्र म्हणून पाचोरा तालुक्यातील परिसरात महाविद्यालयात विविध उपक्रम राबवत असून समाजातील विविध घटक यासाठी आपले योगदान देत असतात. यासाठी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ, संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन विलास जोशी, मानद सचिव महेश देशमुख, संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक (आय. क्य.ए.सी.) च्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले, समन्वयक, डॉ. पी.बी. सोनवणे प्राध्यापक, कुलसचिव, ग्रंथपाल व कार्यालयीन कर्मचारी यंत्रणा कार्यरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.