शिक्षणाच्या मिळालेल्या संधीचे साेने करा, अाई-वडीलांना विसरु नका

0
पाळधीच्या झंवर विद्यालयातील सत्कार साेहळ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन
*पाळधी (प्रतिनिधी)* जीवनात अापल्याला जे व्हायचे अाहे ते अापल्याच मर्जीने व्हावे. शिक्षणाच्या मिळालेल्या माेठ्या संधीचे साेने करून जीवनाला अाकार द्या. माेठे झाल्यानंतर कधीही अापल्या अाई-वडीलांना विसरु नका त्यांचा अादार करा. तसेच इंग्लिश स्कूलच्या स्पर्धेत स. न. झंवर विद्यालयाने १४०० विद्यार्थी संख्या टिकवून ठेवली हे संस्थेचे व शिक्षकांचे कार्य काैतुकस्पद असल्याचे प्रतिपादन झंवर विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
पाळधी येथील स. न. झंवर विद्यालयात ८ फेब्रुवारी रोजी शाळेचे माजी विद्यार्थी व पालकमंत्री गुलाबराव पाटील, धरणगाव पंचायत समितीचे सभापती मुकुंद नन्नवरे यांचा भव्य सत्कार करण्यात अाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील, धरणगाव पंचायत समितीचे सभापती मुकुंद नन्नवरे, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, शालेय समितीचे अध्यक्ष सुनील झंवर, सरपंच  चंद्रकांत पाटील, प्रकाश पाटील, संजय देशमुख, डी. जी. पाटील, एरंडाेल शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अनिल बिर्ला, संचालक गाेविंद लढे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाविस्कर, केंद्रप्रमुख प्रमाेद साेनवणे, मुख्याधिपिका कल्पना झंवर, मुख्याधिपिका कल्पना पाटील, पर्यवेक्षिका शाेभा ताेतला अादी उपस्थित हाेते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची घरापासून बग्गीत भव्य मिरवणूक काढण्यात अाली. मिरवणूकीत विद्यार्थ्यांनी लेझीम व पावरी खेळून लक्ष वेधून घेतले. दीपप्रज्वलन व ईश्वस्तवनानंतर कार्यक्रमाची सुरूवात झाली. सुनील झंवर व शाळेच्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, सभापती मुकुंद नन्नवरे यांचा सत्कार केला. त्यानंतर स्नेहसंमेलनाचे उद‌्घाटन करण्यात अाले. न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना सादर केली. ए. के. महाजन यांनी व गायत्री राठी यांनी सूत्रसंचालन केले. शाेभा ताेतला यांनी अाभार मानले. कार्यक्रमास सागर मणियार, पी. ए. चाैधरी, चेतन साेनवणे, यु. के. हाेले, विवेक भदाणे, एन. ए. शिरसाठ व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
*पालकमंत्र्यांची शैक्षणक साहित्य तुला*
कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची शैक्षणक साहित्याची तुला करण्यात अाली. या कार्यक्रमामुळे गुलाबराव भारावले हाेते. तसेच या अागळ्या-वेगळ्या कार्यक्रमाने व व्यासपीठावर लावण्यात अालेल्या गुलाबराव पाटील यांच्या सन १९८२ मधील बॅचच्या बॅनरने उपस्थिताचे लक्ष वेधून घेतले. तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी गुरूजन व वडीलांना मान देऊन व्यासपीठावर न बसता खाली बसले.
*विद्यार्थी जीवनातील अाठवनींना उजाळा*
गुलाबराव पाटील यांनी भाषणात सामान्य व्यक्तीपासून ते मंत्रीपदापर्यंतचा प्रवास सांगितला. विद्यार्थी जीवनातील अाठवणींना उजाळा दिला. शाळेत अनेक नाटक मी गाजवली अाहे. नाटकात मी असल्यावर पूर्ण शाळा माझ्या साेबत असायची, असे सांगितले. सुनील झंवर यांनी सांगितले की, गुलाबभाऊ व मी जीवलग मित्र अाहाेत. शालेय जीवनापासून अंगात चिकाटी जिद्द हाेती व गुरूवर्यांच्या अाशिर्वादामुळे अाम्ही इथपर्यंत पाेहचलाे असे सांगितले. मुकुंद नन्नवरे यांनी सर्वाच्या साथी व प्रेमामुळे मी यशाचा शिखर गाठत अाहे. तसेच अाजच्या सत्काराने भारावलाे असे सांगितले. कल्पना झंवर यांनी भाऊंनी अाज जी गरूड झेप घेतली ती पाळधीकरांसाठी गाैरवाची अाहे. विद्यार्थी दशेपासून भाऊंचे कार्य उत्तम हाेते. त्यांनी अाज शाळेचे नाव उंचावले अाहे, असे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.