पाचोरा नगरपरिषद येथे मालमत्ताकर व पाणीपट्टी कराची वसूली संदर्भात बैठक संपन्न

0

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा नगरपरिषद येथे वसूली विभागातील सर्व अधिकारी  कर्मचारी यांची मालमत्ताकर व पाणीपट्टी कराची वसूली संदर्भात दि. २१ रोजी संध्याकाळी  वाजता संजय गोहील यांचे अध्यक्षेतेखाली बैठक संपन्न झाली. यात शहरातील थकित व चालू मालमत्ताधारकांवरील कर तसेच पाणीपट्टी धारकांककडील येणे असलेली पाणीपट्टी कराची रक्कम वसूल करणे करीता नगरपालिका कार्यालयात आढावा बैठक आयोजीत करण्यात आलेली होती.

सदर बैठकीत ज्या नागरीकांनी मालमत्ताकर व पाणीपट्टीकराचा भरणा केलेला नाही. त्यांनी त्यांचकडेस येणे असलेली कराचा भरणा त्वरीत करावा अन्यथा सर्व थकबाकीदारांची नावे शहरातील मुख्य चौकात व वृत्तपत्रात प्रसिध्द करुन त्यांचे नळसंकूल बंद करुन मालमत्ता जप्त करण्यात येतील असे निर्देश अध्यक्ष संजय गोहील व मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी दिले.

सदर बैठकीस प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, कर निरीक्षक दगडू मराठे, विधी अधिकारी भारती निकुंभ, उध्दव महाजन, विजय बाविस्कर, सखाराम ठाकरे, शाम अहिरे, विशाल मराठे, प्रशांत बडगुजर, रफिक बेग, शरद नागणे, युवराज जगताप, संजय कुलकर्णी, विलास कुलकर्णी, सुकदेव ठाकुर, भिकन गायकवाड, दिलीप गायकवाड, शरीफ लतीफ खान, संदिप खैरनार, रिंकु कंडारे, किरण सोनवणे, हिम्मत महाजन इ.कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.