आ.मंगेश चव्हाणांच्या पाठपुराव्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लागणार

0

 मुंबई – चाळीसगाव विधानसभा मतदारसंघासह महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळा मध्ये कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीला आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह पुसदचे आमदार इंद्रनील नाईक, इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालयाचे प्रधान सचिव,जे.पी.गृप्ता, राज्याचे संचालक दिलीप हळदे, महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा संचालक संघाचे पदाधिकारी, स्वराज्य शिक्षक संघाचे प्रदेश अध्यक्ष व पदाधिकारी, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह व पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार मंगेश चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी सदर बैठक आयोजित करून हे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत अशी विनंती केली होती.

सदर बैठकीत राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळा मध्ये कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या खलील मागण्यांवर चर्चा करण्यात आली व त्याबाबत कार्यवाहीचे निर्देश मंत्री महोदयांनी संबंधित अधिकारी वर्गाला दिले :-

त्यातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे होत्या.

१. वरिष्ठ व निवड श्रेणी मान्यतेचे अधिकार सहाय्यक आयुक्तांना देण्यात यावेत.

२. वसतिगृह अधीक्षकांना आदिवासी विभागा प्रमाणे वरिष्ठ वेतन श्रेणी ४२०० रुपये देण्यात यावी.

दिला जात असणारा २४०० चा ग्रेड पे पूर्ववत देण्याबाबत सुरु असलेली वजावट थांबविण्यात यावी.

४. थकीत वेतन देयक मंजुरीचे सर्व अधिकार सहाय्यक आयुक्तांना देण्यात यावेत.

५. शिक्षक कर्मचाऱ्यांना वाहन भत्ता व शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा घरभाडे भत्ता पूर्ववत करण्यात यावा.

६. कनिष्ठ महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर ७ वा वेतन आयोग लागू करणे.

७. १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचान्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे.

८. आश्रमशाळा शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करणे.

९. आश्रमशाळांचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व आश्रमशाळा डिजीटल करणे.

Leave A Reply

Your email address will not be published.