पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा

0

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.परवेझ मुशर्रफ यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप आहे.  न्यायमूर्ती वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील 3 सदस्यीय खंडपीठाने 2-1 ने निर्णय देताना, मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली.

पेशावरमधील विशेष न्यायालयाने २००७ मध्ये पाकिस्तानात जारी करण्यात आलेली आणीबाणीच्या खटल्यामध्ये त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  देशात आणीबाणी पुकारणे हा देशद्रोह असून त्याच आरोपाखाली मुशर्रफ यांच्यावर खटला चालविला जावा, अशी मागणी करणारी याचिका येथील त्रिसदस्यीय विशेष न्यायालयात २०१३ साली दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने ग्राह्य धरत खटला दाखल करुन घेतला होता. मागील सहा वर्षांपासून या प्रकरणामध्ये सुनावणी सुरु होती. अखेर या प्रकरणी आज न्यायलयाने आपला निर्णय सुनावला असून मुशर्रफ यांनामृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, मुशर्रफ सध्या पाकिस्तानात नाहीत. त्यांच्यावर दुबईत उपचार सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.