पाकिस्तानकडून अफगाणिस्तानमध्ये रॉकेट हल्ला; हल्ल्यात ९ ठार

0

लाहोर : पाकिस्तानने अफगाणिस्तानवर रॉकेट हल्ला केला असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या ९ लोकांचा मृत्यू झाला असून ५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाक़डून याबाबत माहिती देण्यात आली. तर दुसरीकडे अफगाणिस्तानने पहिल्यांदा पाकिस्तानवर हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानदरम्यान सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. यादरम्यान, पाकिस्तानने आपल्या सीमेवरून अफगाणिस्तानमधी सीमेनजीक असलेल्या शहरावर रॉकेट हल्ला केला. अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी हा दावा केला. या नंतर दोन्ही देशांमध्ये तणाव अधिक वाढला असून अफगाणिस्तानने आपल्या लष्कराला आणि हवाई दलाला हाय अलर्टवर ठेवले आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्ताननं पहिल्यांदा पाकिस्तावर हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.