पहूर येथे बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर रूट मार्च

0

पहूर, ता. जामनेर (वार्ताहर) :- कोरोना विषाणू संक्रमणाच्या अनुषंगाने बकरी ईदचा सण सर्व  मुस्लिम बांधवांनी आपल्या घरीच साजरा करावा ,या पार्श्‍वभूमीवर पहूर पोलिस ठाण्याच्या वतीने शांतता समितीची बैठक घेण्यात येऊन रूट मार्चचे आयोजन करण्यात आले.

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कुरेशी,खाटीक समाज बांधवांची मिटींग घेवुन त्यांना गोवंश कायद्या बाबत सुचना देवुन,उघड्यावर विनापरवानगी जनावरांची कुरबानी करू नये, बाबत सुचना देवुन सीआरपीसी 149 प्रमाणे नोटीस अदा करण्यात  करण्यात आल्या आहेत.तसेच शासना कडील परीपत्रका प्रमाणे देखील सुचना देण्यात आल्या आहेत. 9 कुरेशी बांधव  मीटिंग करिता उपस्थित होते.पहूर पोलिस  ठाण्याच्या  हद्दीत शेंदूर्णी  व पहूर येथे बकरी ईद आणि अगामी सणांच्या अनुषंगाने  रूट मार्चचे आयोजन करण्यात आले .या वेळी चार अधिकारी ,पहूर पोलिस ठाण्याचे 15 कर्मचारी,  12 होमगार्ड हजर होते. सदरचा रूट मार्च शेंदूर्णी व पहूर शहर मध्ये संमिश्र लोकवस्ती मधुन घेण्यात आला आहे.

संपूर्ण देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग संक्रमित होत असल्याने शासनाच्या आदेशाप्रमाणे मुस्लिम बांधवांनी रमजान ईद ज्या पद्धतीने आपल्या घरीच नमाज अदा करून साजरी केली त्याच पद्धतीने उद्याच्या बकरी ईदला सुद्धा सर्व मुस्लिम बांधवांनी आपल्या घरीच नमाज अदा करावी .  ईदगाह मैदानावर नमाज साठी जाऊ नये . सर्व समाज बांधवांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी केले आहे

 

,

,

पहूर पोलिस ठाणे .

Leave A Reply

Your email address will not be published.