पहूर शहर संघटनेतर्फे परीचारीकांचा सत्कार

0

पहूर, ता. जामनेर (वार्ताहर) : आपल्या परीवाराची व स्वतः च्या जीवाची पर्वा न करता कोरोना मुक्तीच्या लढ्यात महत्वाचे योगदान देणाऱ्या परिचारिकांचा आज परिचारीका दिनाचे औचित्य साधून पहूर शहर पत्रकार संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.

रुग्णालयात अधिपरीचारक, परीचारीका कोरोना योध्दे म्हणून सेवा देत आहेत. या कार्याला शतशः नमन करून सर्व परिचारकांचा सोशल डिस्टंन्सीगचे पालन करून सत्कार करण्यात आला.

यावेळी जेष्ठ पत्रकार शांताराम बापू लाठे यांनी परिचारकांच्या कार्याचा गौरव केला. याप्रसंगी ऋषिकेश भालेराव, सरोज बेडसे, दिपक वाघ यांच्यासह सर्व अधिपरिचारक व अधिपरिचारिका यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ.पुष्कराज नारखेडे,डॉ.जितेंद्र वानखेडे , देवेंद्र घोंगडे यांच्यासह सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.