कोरोनाच्या नावाखाली ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांकडून लाखोंचा निधी लाटण्याचा धक्कादायक प्रकार

0

जळगाव (प्रतिनीधी): जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून मोठ्या शहरासह याची नजर आता खेड्यापाड्यावर पोहचली आहे. यावर प्राथमिक उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायती प्रामुख्याने सर्व गावात जंतुनाशक फवारणी, सॅनीटायझर व मास्क वाटप, दिव्यांग बांधवाना किराणा सामानाचे वाटप आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र, या उपक्रमाच्या नावाखाली ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आपसात संगतमत करून लाखो रुपयांचा निधी लाटण्याचा भयंकर प्रकार समोर येत आहे.

कोरोनाच्या प्रार्दुभाव रोखण्यासाठी गावात विविध उपाययोजनांच्या नावाखाली जिल्ह्यातील काही ग्रामपंचायती ग्रामिण भागातील जनतेची दिशाभुल करून ग्रा.प. मधील निधीवर डल्ला मारत आहेत. परंतू याबाबत संबंधित जिल्ह्यातील ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने याचा फायदा सरपंच व ग्रामसेवक घेताना दिसत आहेत.

ग्रामसेवक, सरपंच यांचे संगनमत 
जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी गावात कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून सुरू केलेल्या ग्रामपंचायतचा निधी परस्पर खर्च करण्याचा प्रकार सुरू असून याला गावातील काही समाजसेवक व ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध दर्शवला असता त्यांच्यावर सरपंच व ग्रामसेवक चांगलाच दबाव आणून त्यांना चूप बसवून दोघांच्या संगनमताने गावाचा पैसा लाटत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.