पवन एक्सप्रेसमधून दोन कोटीच्या रोकडसह दोघे ताब्यात

0

भुसावळ आरपीएफची कौतुकास्पद कामगीरी

भुसावळ :- पवन एक्स्प्रेसमधून अपहारातील तब्बल दोन कोटींची रोकड नेणाऱ्या  दोघा आरोपींना भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाने खंडव्यानजीक जेरबंद केल्याची घटना बुधवार रोजी रात्री घडली. आतापर्यंतची ही रेल्वे सुरक्षा बलाची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

मुंबई क्राईम ब्रँचने भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाचे एएससी व डीएससी यांना अपहार प्रकरणातील दोन संशयीत दोन कोटींच्या रोकडसह पवन एक्स्प्रेसने जात असल्याची गोपनीय  माहिती दिली होती. त्यावरून डीएससी क्षितीज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली गाडीतील आरपीएफच्या गस्तीपथकाने सापळा रचून  संशयीतांच्या हालचालींवर नजर ठेवण्यास सांगण्यात आले तर खंडवा आरपीएफला या कारवाईबाबत सूचित करण्यात आले. गाडी खंडवा रेल्वे स्थानकावर आल्यानंतर सापळा रचून संशयित आरोपी विनोद झा व अमित यादव या दोघां आरोपींना जेरबंद केले तपासणी  करून त्यांचे  ताब्यातून तब्बल दोन कोटींची रोकड जप्त करण्यात आली. दरम्यान, आरोपींनी ही रोकड नेमकी कोणाची कुठून व कशी लांबवली व ते कुठे घेवून जात होते? याबाबत  अद्याप माहिती उपलब्ध होवू शकलेली नाही. मुंबई येथील गुह्यातील फरार आरोपी असल्याने मुंबई क्राइम ब्रँचकडे वर्ग करण्यात आले

Leave A Reply

Your email address will not be published.