स्लीपर बसची ट्रकला धडक ; १६ ठार, ३५ जखमी

0

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवरील घटना

लखनऊ : आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या एका स्लीपर बसने उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघातात जण ठार झाले आहेत. तर ३५ जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.  अपघातातील जखमींना सेफई पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बसमधून ९० जण प्रवास करत होते.

ही खासगी बस जेव्हा एक्स्प्रेस वेवरील फिरोझाबादमधील भदान गावाजवळ पोहोचताच अचानक ताबा सुटल्याने बस रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर वेगाने आदळली.  त्यानंतर मोठा आवाज झाला. ही टक्कर इतकी जोराची होती की, व्होल्वो बसचा चक्काचूर झाला.  घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. सर्व जखमी प्रवाशांना सैफईच्या पीजीआय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.