पर्यावरणाच्या समतोलासाठी २ हजार वृक्षांचे संगोपन

0

कृष्णराव पाटील माध्यमिक शाळा व डॉ. संजीव पाटील फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
सागर महाजन
भडगाव ;- भडगाव व पाचोरा दोन्ही तालुक्यातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी भडगाव तालुक्यातील आंचळगाव चे डॉ. संजीव पाटील यांनी कै. कृष्णराव पाटील माध्यमिक शाळा व डॉ. संजीव पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून परिश्रम घेत आहेत . पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये 2000 वृक्षांची लागवड केली आहे . त्यातील पंधराशे वीस वृक्षांचे प्रत्यक्ष संवर्धन डॉ. संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाने सुरू आहे . आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून रुग्णसेवा सोबतच पर्यावरणाचा समतोल राखता यावा म्हणून गेल्या अनेक दिवसापासून डॉक्टर संजीव पाटील ग्रामीण भागांमध्ये वृक्षलागवडीचे काम करत आहे.

त्यासाठी मागील वर्षभरात भडगाव पाचोरा शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले . तालुक्यात अंचळगाव , धोत्रे रस्ता , कोळगाव खेडेगाव, पिचर्डे , पांढरद, वडजी, कोटली, पळासखेडे, वाडे, गुढे, वरखेड , कनाशी, निंभोरा ,कजगाव भोरटेक, सावदा, तांदुळवाडी आदी भागात वृक्षरोपण केले आहे . तालुक्यात आंचळगाव भागामध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असते. वर्षानुवर्षे ही टंचाई नागरिकांना भेडसावत असल्याने व वृक्ष नसल्याने आरोग्य समस्या निर्माण होत आहे,

त्यावर उपाययोजना म्हणून डॉ. संजीव पाटील यांनी येथील दोन्ही तालुक्यांची गरज लक्षात घेता वृक्ष लागवड व संवर्धनाचे काम हाती घेतले आहे . त्यासाठी दर रविवारी सुटीचा वेळ राखीव ठेवून ते स्वता ट्रॅकर ने वृक्ष संवर्धनाच्या कार्यासाठी आठ ते दहा जणांच्या ग्रुपने सातत्याने पाणी देण्याचे काम करत आहे . पाचोरा भडगाव तालुक्यात ठीकठिकाणी मागील वर्षभरात ही रोपे लावण्यात आल होते . आज आरोग्य सेवेसह प्रत्यक्ष संवर्धनाचे काम डॉ संजीव पाटील हे करत आहेत. आज प्रत्यक्ष संवर्धन झालेली पंधराशे वीस वृक्ष आहेत, ही रोपे तीन ते चार फुटापासून 20 फुट उंची पर्यंत झाले आहेत . शासनाची कोणतीही मदत न घेता स्वखर्चातून डॉक्टर पाटील यांनी पंधराशे वीस वर्षांची प्रत्यक्ष संवर्धन केले आहे .

येथील डॉ संजीव पाटील हे फाऊंडेशन च्या मद्यामातून समाजोपयोगी कार्यासाठी आघाडीने पुढाकार घेत आहे .
स्वखर्चाने एका एका झाडाला पाणी देण्याचे काम ते करत आहेत. पर्यावरण समतोल राखल्या शिवाय याभागातील पाणी टंचाई व आरोग्य समस्या कमी होणार नाही , म्हणून या भागात अधिक झाडे लावण्याचा संकल्प त्यांनी केला आहे . शिवाय एक झाड एक कार्यकर्ता योजना सुरु करून अनेकांना वृक्षरोपण करण्याचा संदेश देत आहेत . डॉ संजीव पाटील यांनी यापूर्वी ही तळागाळातील अनेक लोकांना घरोघरी जाऊन संत महापुरुषांच्या प्रतिमा वाटून विविध जयंती उत्सव साजरा करण्यावर डॉ पाटील यांनी मोहीम आखली आहे . त्या माध्यमातून सर्वांना एकत्र जोडण्याचे काम ते करत असून सर्वधर्मसमभाव असा संदेश ते देत आहेत .

Leave A Reply

Your email address will not be published.