पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तींने दोन झाडे लावावीत – ना. सदाभाऊ खोत यांचे आवाहन

0

ध्वजारोहण, शानदार संचलनाने महाराष्ट्र राज्य स्थापना दिन उत्साहात साजरा
जळगाव;- ध्वजारोहण, मानवंदना आणि त्यानंतर पार पडलेल्या शानदार संचलनाने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५८ व्या वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्य विविध क्षेत्रात प्रगती करुन आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राज्यातील वाढते तापमान लक्षात घेता भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक असून यासाठी राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत येत्या पावसाळ्यात प्रत्येक नागरीकाने किमान दोन झाडे लावून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी पुढे आले पाहिजे. असे आवाहन राज्याचे कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ राज्याचे कृषि व फलोत्पादन, पणन आणि स्वच्छता व पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील, आ. सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील, पोलीस उपअधिक्षक (मुख्यालय) रशीद तडवी, सचिन सांगळे, जितेंद्र पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे तसेच स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

यावेळी ना. खोत म्हणाले की, आजपासून राज्य शासनाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शहिद सन्मान योजनेतंर्गत शहिदांच्या पत्नींना एसटी बस मध्ये मोफत प्रवास सवलत योजना सुरु केली आहे. तसेच सर्व नागरीकांशी संबंधित व जिव्हाळ्याचा विषय असलेला डिजीटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ देण्याच्या मोहिमेचा शुभारंभही आजपासून होत आहे. शासन सर्वसामान्य नागरीकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक पावले उचलत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पोलीस कवायत मैदान येथे सकाळी आठ वाजता ना. खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शानदार संचलन करण्यात आले. त्यात जिल्हा पोलीस दल, होमगार्ड, वाहतुक पोलीस, महिला पोलीस पथक, बॉम्ब शोधक पथक, अग्निशमन पथक, पोलीस बॅण्ड पथक, वरुण पथक, फायर फायटर पथक, रेस्क्यु व्हॅन, मिडीया व्हॅन, इंडियन रेड क्रॉस सोसायटी मोबाईल ब्लड डोनर व्हॅन, निर्भया पथकांनी संचलनात सहभाग घेतला. या संचलनाचे नेतृत्व कमांडिग ऑफिसर प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक्षक धनंजय पाटील यांनी केले. यावेळी ना. खोत यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू, कर्मचारी, पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळालेले पोलीस कर्मचारी, शहिद सैनिकांच्या विधवा यांना गौरविण्यात आले.

सन्मानार्थिंची नावे याप्रमाणे-

जिल्हा युवा पुरस्कार-

युवक- भूषण दिलीप लाडवंजारी,

संस्था- इंडियन रेड क्रॉस सोसायटी

गुणवंत खेळाडू – भोलेनाथ चौधरी, वेटलिफटीग, विशाखा सपकाळे, तायक्वांदो,

दिव्यांग खेळाडू – अंश देवेंद्र पिल्ले, जलतरण

क्रीडा मार्गदर्शक – ‌श्री प्रविण ‌ठाकरे,

क्रीडा संघटक कार्यकर्ता- श्रीमती अनिता कोल्हे

पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह-

पोलीस अधिकारी/कर्मचारी :- सर्वश्री. ज्ञानेश्वर शिवराम पाकळे, पोलीस उप निरीक्षक नेमणूक पोलीस ठाणे, निंभोरा, काशिनाथ त्रिंबक सुरळकर, पोलीस उपनिरीक्षक नेमणूक पोलीस ठाणे, भुसावळ शहर, सहाय्यक फौजदार संजय सदाशिव पंजे. नेमणूक पोलीस ठाणे, चाळीसगाव शहर, सहाय्यक फौजदार भिकन गोविंद सोनार, नेमणूक मोटार परिवन विभाग, जळगाव. पोलीस हेडकाँस्टेबल :- प्रविण प्रल्हाद पाटील, नेमणूक पोलीस अधिकारी कार्यालय, वाचक शाखा, माणिक सोनजी सपकाळे नेमणूक पोलीस ठोण भुसावळ बाजार पेठ, सुभाष सिताराम सुर्यवंशी नेमणूक पोलीस मुख्यालय, वसंत वल्लभ मोरे, नेमणूक ए. टी. सी. जळगाव, राजेंद्र दिनकरराव पाटील नेमणूक पोलीस ठाणे पिंपळगाव हरेश्वर, प्रमोद गंगाधर चौधरी नेमणूक पोलीस ठाणे, रावेर. पोलीस नाईक :- महेंद्र राजाराम पाटील ने. स्थागुशा, सचिन अशोक चौधरी ने. पोलीस मुख्यालय, अशरफोद्यीन शेख निजामोद्यीन ने. पोलीस ठाणे, एमआयडीसी. पोलीस हवालदार :- धनराज नामदेव शिंदे ने. ए.टी.सी. जळगाव, नंदकिशोर काशिनाथ सावखेडकर ने. पीसीआर, जळगाव.

डिजीटल स्वाक्षरीयुक्त 7/12 उतारा देण्याच्या योगदानाबद्दल प्रशस्तीपत्रक दिलेले तलाठी –

सर्वश्री. टी. सी. बारेला, ए. ए. तडवी, जी. सी. बारेला, वाय. आय. तडवी, व्ही. डब्लू. पाटील, ए. एस. महाजन, एस. ए. झोटे, प्रविण शिंपी, एस. टी. जगताप.

आदर्श तलाठी पुरस्कार – जनार्दन दत्तात्रय भंगाळे, हिंगोणे, ता. यावल.

शहिद सन्मान योजनेतंर्गत मोफत एसटी प्रवास सवलत कार्ड वितरण केलेल्या वीरपत्नी – श्रीमती निर्मला सुवालाल हनुवते, कल्पना विलास पवार, सरला भानुदास बेडीस्कर, सुनंदा वसंत उबाळे, सुरेखा पोपट पाटील, कविता राजू साळवे, कल्पना देविदास पाटील, रंजना अविनाश पाटील.

रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत जिल्हा पोलीस दल, वाहतुक शाखा, परिवहन विभाग यांच्या वतीने आज हेल्मेट जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीला पोलीस कवायत मैदानावर ना. खोत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. ही रॅली शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन परिवहन कार्यालयात समारोप करण्यात आला.

त्यानंतर ना. खोत यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व मान्यवरांना भेटून शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. गयाज उस्मानी आणि राजेश यावलकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील तसेच सर्व विभागप्रमुख, कर्मचारी आदी उपस्थित होते.

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात ध्वजारोहण

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारातही महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी इमारतीतील सर्व कार्यालयांचे प्रमुख तसेच सर्व विभागप्रमुख, कर्मचारी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.