परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण

0

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने टळली दुर्घटना, शहरात खळबळ

यावल
शहरातील साने गुरुजी विद्यालयातील इयत्ता दहावीच्या परीक्षा केंद्रावर पेपर सुटल्यानंतर दोन विद्यार्थ्यांना ते तीस जणांच्या गटाने बेदम मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजे नंतर घडली. दोघे जखमी विद्यार्थ्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. काही जणांनी व पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटना टळली.
येथील साने गुरुजी विद्यालयात इयत्ता परीक्षा केंद्र आहे मंगळवारी या परीक्षा केंद्रावर इयत्ता दहावी चा इंग्रजी चा पेपर होता तर या परीक्षा केंद्रावर परवेज मुसा तेली वय 19 रा. चोपडा व दानिश इरफान बेग वय 22 रा. चोपडा हे परीक्षा देण्यासाठी आले होते तर पेपर सुटल्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास परीक्षा केंद्राच्या आवारातच त्यांना वीस ते पंचवीस जणांच्या गटाने हातात लाठ्या-काठ्या घेऊन चेहर्‍यावर रुमाल बांधून या दोघांना जबर मारहाण करण्यास सुरुवात केली यामध्ये त्यांचे डोके व पाठी वर गंभीर जखमा झाल्या आहेत परीक्षा केंद्र बंदोबस्तासाठी असलेले पोलिस व काही नागरिक तसेच शिक्षक भूषण नगरे, विनोद गायकवाड आदींनी या विद्यार्थ्यांना मारहाण करणार्‍यांपासून सोडवत येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले येथे डॉक्टर शुभम जगताप प्रियंका मगरे आदींनी दोघांवर प्रथम उपचार केला व दोघांना जळगाव येथे हलवण्यात ची तयारी सध्या सुरू असून तत्पूर्वी पोलिसांकडून त्यांचे जाबजबाब घेतले जात आहे.
या प्रकारामुळे शहरात खळबळ.
शहरात साने गुरुजी विद्यालय तसेच डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल अशी दोन परीक्षा आहेत बारावी व दहावीच्या सध्या परीक्षा सुरू असून दोन्ही केंद्रावर टारगट आणि कॉपी बहाद्दर यांचा सुळसुळाट असतो तेव्हा याचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी पुढे आली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.