परवानगीपेक्षा जास्त रेतीची साठवणूक करणाह्या रेती धारकांना नोटीस

0

खामगावः जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवड रेती घाटातून शेगाव तालुक्यातील भास्तन येथील गट.नं.६८ मध्ये करण्यात आलेल्या रेती साठ्याबाबत महसूल प्रशासनाने संबंधित रेती धारकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याचवेळी रेती साठवणुकीसाठी जागा देणाह्या जागा मालकालाही महसूल प्रशासनाने चांगलेच धारेवर धरले आहे. त्यामुळे खामगाव आणि परिसरातील रेती माफीयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

खामगाव येथील रेतीधारक समीर दुष्यंत दलाल यांना जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवड रेतीघाटातून १२०० ब्रास रेतीची परवानगी असतानाही रेतीधारक दलाल यांनी १९१० ब्रास रेतीचा साठा केला. महसूल प्रशासनाच्या तपासणी दरम्या.न ७१० ब्रास अतिरिक्त रेतीसाठा आढळून आला. यापूर्वी १८ जून रोजी तपासणी दरम्यान ९९५ ब्रास रेतीसाठा अतिरिक्त आढळला होता. त्यावेळी पुढील आदेशापर्यंत रेती उचल न करण्यासंदर्भात कंत्राटदाराला निर्देशीत केले होते. तसेच २२ जूनच्या पत्रानुसार खुलासा मागीतला होता. मात्र, अद्यापही खुलासा सादर केला नसल्याचेही शेगाव तहसीलदारांनी संबंधितांना सादर केलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे. दरम्यान, २६ जूनच्या तपासणीदरम्यान घाटमालक समीर दलाल यांच्यावतीने प्रतिनिधी म्हणून बजरंग दलाचे प्रांतअध्यक्ष अमोल अंधारे उपस्थित होते. मात्र, प्रत्यक्ष पंचनाम्यावर त्यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याचेही शेगाव तहसीलदारांनी रेतीधारक घाटमालक समीर दलाल यांच्या नोटीसमध्ये नमूद केले आहे.

२८५ ब्रास रेती विक्रीबाबत खुलासा द्या!

-भास्तन येथील शेत सर्व्हे नं.६८ मध्ये साठा केलेल्या रेती साठ्याची १८ जून रोजी मोजणी करण्यात आली. त्यावेळी ९९५ ब्रास रेतीसाठा अतिरिक्त आढळून आला. तर २६ जून रोजी पुर्नमोजणी दरम्यान ७१० ब्रास रेतीसाठा अतिरिक्त आढळला. दरम्यान, १८ आणि १६ जून रोजीच्या मोजणी दरम्यान वाढीव आढळलेला २३५ ब्रास रेतीसाठा विक्रीबाबत स्थळ प्रतीसह खुलासा सादर करण्याची नोटीस दलाल यांना शेगाव तहसीलदार शीतल बोबडे यांनी २८ जून रोजी बजावली आहे.

रेतीसाठा करणारे महसूलच्या रडारवर

भास्तन येथील गट नं.६८ मध्ये परवानगी दिलेल्या रेतीसाठ्यातून  जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या परवागनीशिवाय घाटमालक तसेच कोणत्याही व्यक्ती, वाळू माफीयास शेगाव तहसील कार्यालयाच्या परवानगीशिवाय रेतीची उचल करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाईची नोटीस शेत मालक अनंता बबन मिरगे यांना बजावली आहे. यासह परिसरातील इतरही रेतीसाठा करणाह्या मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. तरी देखील 28 जूनच्या रात्री शेगांव रस्त्यावरून अनेक गाड्यांद्वारे रेती वाहतूक झाली असल्याचे समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.