पत्रकार दिनानिमित्त अमृत ग्रुपतर्फे पत्रकारांचा सत्कार

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

आद्य प्रवर्तक, मराठी वृत्तपत्राचे जनक आदरणीय आचार्य बाळासाहेब जांभेकर यांच्या स्मृतीस अभिवादन करीत अमृत ग्रुप व पारोळा व्यापारी महासंघाच्या वतीने ६ जानेवारी हा पत्रकार दिन साजरा केला. प्रथम बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर अमृत कलेक्शनच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात पारोळा येथील पत्रकारांचे अभिनंदन व भेट वस्तु देऊन सत्कार सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष स्थानी जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील हे होते. यावेळी आपल्या मनोगतात भूपेंद्र मराठे म्हणाले की, पत्रकार हा समाजाभिमुख व समाजशील असतो. परंतु व्यापारी आपल्या व्यवसायाव्यतिरिक्त अनभिज्ञ असतो व रहातो. पारोळा व्यापारी महासंघाने पत्रकार यासारखा रुष्ट विषयात रस घ्यावा ही अभिनंदनीय बाब आहे.

तर अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, सर्व पत्रकारांनी एकजुट होऊन एक दिलाने काम करावे तरच या पत्रकारांच्या लेखणीला मान असेल म्हणून सर्व पत्रकारांनी एकसंघ होऊन काम करावे.

याप्रसंगी अभय पाटील, नगरसेवक नितीनभाऊ सोनार, आकाश महाजन, प्रा. प्रदिप आहुजेकर, प्रा. विकास सोनवणे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष केशव क्षत्रिय यांनी मनोगत व्यक्त केले. तर शेवटी महाराष्ट्रची माई म्हणून ओळख असलेल्या स्व. सिंधुताई सपकाळ यांना पारोळा व्यापारी महासंघ व पारोळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी व्यापारी महासंघाचे सचिव संजय कासार, पारोळा कापड व्यापारी असोसिएशनचेचे अध्यक्ष रोशन शहा, अमृत कलेक्शनचे मोहन क्षत्रिय, अमृत सक्रिय धर्मेंद्र क्षत्रिय, प्रफुल्ल क्षत्रिय हे उपस्थित होते. तर सूत्रसंचालन व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लालवाणी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.