न्यायालयीन कामकाजासाठी तारखेवर आलेल्या विवाहितेसह कुटुंबियांवर दंगलीचा गुन्हा

0
जळगाव: वाघडी ता. चाळीसगाव येथील विवाहिता व तिचे कुटुंबिय न्यायालयीन कामकाजासाठी  जळगावात आल्याने  विवाहितेसह  तिच्या पतीत वाद  होऊन  पोलीस ठाण्यातच जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी १.३०च्या  सुमारास शहर पोलीस ठाण्यात घडला. पोलीस ठाण्यातच हाणामारी होत असल्याचे पाहून पोलिसांनी दोघांची सुटका केली. हे प्रकार घडत असतांना या वेळी  विवाहितेची लहान बहीण व वडिलांनी पोलिसांवर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला. तसेच पोलीस ठाण्यात आरडाओरड करून  गोंधळ ही घातल्याने शहर पोलीस ठाण्यात बघणाऱ्यांची गर्दी झाली होती.
चाळीसगाव  येथील रश्मी विशाल सोनवणे हिचा दि २८ फेब्रुवारी २०१६ रोजी  जळगावात रिंग रोड येथील शंकरवाडीतील शिवनेरी अपार्टमेंटमधील  विशाल उत्तम सोनवणे याच्याशी विवाह झाला. लग्नानंतर अडीच महिने उलटत नाही तर तोच पतीकडून माहेरुन १० लाख रुपये आणण्यासाठी मागणी करण्यात आली. ते न दिल्याचा राग आल्याने सासरे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक व जेठ तुषार सोनवणे ( जिल्हा परिषद बांधकाम विभाग ) यांनी ही रश्मीला
अपशब्द बोलून त्याला अपमानित करून घरातून काडून दिला होता. त्यांच्या  विरोधात रश्मी यांनी जिल्हापेठ पोलिसात व यानंतर महिला दक्षता समितीकडे तक्रार ही केली होती तसेच रश्मी यांनी नांदण्यास तयार असल्याचे सांगिलते होते. तरी ही सासरच्या मंडळींकडून तिला स्वीकारण्याच्या मनस्थिती नसल्याने  महिला दक्षता येथे सुनावणीअंती याप्रकरणावर चाळीसगाव येथील न्यायालयात कामकाज सुरु आहे.तसेच रश्मीला गुन्हा मागे  घेण्यासाठी पतीकडून धमकण्यात आला तसे न केल्यास आम्ही ही तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करू अशी दमदाटी करण्यात आली. तसेच पतीकडून दि १७ नोव्हेबंर २०१७ रोजी     रश्मीसह तिचे आई वडील  व बहिणी यांनी शिवीगाळ तसेच मारहाण केल्याबाबत जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. यावर जिल्हा न्यायालयात  सध्या कामकाज ही  सुरु आहे.
न्यायालयात शिवीगाळ
पतीने न्यायालयात केलेल्या तक्रारीवरील कामकाज शुक्रवारी जिल्हा न्यायालयात होते. या कामकामासाठी रश्मी तिचे वडील, आई, बीएसएफ जवान असलेला भाऊ तसेच बहिण हे जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात आले. याठिकाणी पती विशाल तसेच सासरे उत्तम दिपचंद सोनवणे समोर येताच एकमेकांना   शिवीगाळ झाल्याचा प्रकार झाला. याबाबत तक्रार देण्यासाठी विशाल वडीलांसह शहर पोलीस ठाण्यात आला. त्यांची तक्रार पोलीस घेत असतांना विवाहितेसह तिचे कुटुंबिय ही शहर पोलीस ठाण्यात धडकले तसेच यावेळी पोलिसांसमोर ही बाचाबाची झाली त्यामळे शहर पोलिस स्टेशन मध्ये  (क ४६६ व १६० असे लावण्यात आले) दोन्ही मंडळींवर गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच न्यायालयीन तारखेवर आलेल्या विवाहितेसह पतीचा तक्रारीवरून दंगलीचा गुन्हा नोंदवण्यात आला.
 ठळक मुद्दे
* लग्नाच्या २ महिन्यानंतर १० लाखाची मागणी
* पैसे न दिल्याने विवाहितेला पाठविले माहिरी
* विवाहितेकडून पती व सासरे विरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली
* तक्रार  वापस घेण्यासाठी पतीकडून धमकावण्यात आला
* तक्रार  वापस न घेतल्याने पतीची पत्नीविरुद्ध तक्रार
* विवाहितेसह तिचा कुटुंबीयांवर न्यायालयीन आवारात शाब्दिक व हाणामारी केल्याने पतीचा तक्रारीवरून  दंगलीचा गुन्हा

Leave A Reply

Your email address will not be published.