नोंदणीकृत 274 शाळांमध्ये 3717 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश

0

शिक्षण हक्क कायदयानुसार नोंदणी, प्रवेशासाठी वय किमान 6 वर्षे पुर्ण
जळगांव | प्रतिनिधी
शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. या राखीव जागांसाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. गत 10 दिवसांमध्ये जिल्ह्यातून तब्बल 4 हजार 307ऑनलाइन अर्ज शिक्षण विभागाच्या पोर्टलवर भरण्यात आले आहेत. जिल्ह्यातील आरटीई नोंदणीकृत 274 शाळांमध्ये 3717 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्याचा कालावधी 5 ते 22 मार्च पर्यंत राहणार आहे. यावर्षी आरटीई प्रवेशांतर्गत 274 शाळा पात्र ठरल्या आहेत. प्रवेशासाठी किमान वय 6 वर्षे 0 महिने 1 दिवस ते 6 वर्षे 11 महिने 29 दिवस एवढे आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्ह्यातील आरटीई नोंदणीकृत शाळांमधील 25 टक्के राखीव जागांसाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया 5 मार्चपासून सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील खासगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायित 274 शाळांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 22 मार्चपर्यंत पालकांना 25 टक्के मोफत प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. त्यानंतर शिक्षण विभागाकडून प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. वेळापत्रकानुसार पहिल्या फेरीत शाळेपासून एक कि.मी. किंवा त्यापेक्षा कमी अंतरावरील पाल्यांचा प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. यावर्षी जागा कमी असतानासुद्धा मोठ्या प्रमाणात पालकांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत.

                                                                                                                                                                                      उर्वरित उद्याच्या अंकात…

Leave A Reply

Your email address will not be published.