मी पाहिलेल्या मुख्यमंत्री स्वप्नामुळे अनेकांच्या मनात धडकी ; आ. खडसे

0

विद्यापीठस्तरीय निंबध स्पर्धेत विद्यार्थ्यानी पटकाविले बक्षिसे ; गुरुनाथ फाऊंडेशन आयोजित निबंध स्पर्धेचे भुसावळात पारितोषिक वितरण
भुसावळ | प्रतिनिधी
गुरुनाथ फाउंडेशनतर्फे आयोजित निबंध स्पर्धेत एका विद्यार्थ्याने लोकप्रतिनीधी म्हणून मला संधी मिळाली तर या विषयावर लिहिलेल्या निबंधात “स्वप्न असेपाहावे की चांगल्या चांगल्यांच्या मनात धडकी भरली पाहिजे असा उल्लेख केलेला आहे . याच्यावर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी त्या निबंधाचे वाचन करून सांगितले की मी सुद्धा मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहिले होते . मात्र माझ्या या स्वप्नामुळे चांगल्या चांगल्यांच्या मनात सुद्धा धडकी भरली होती यामुळे या विद्यार्थ्याने लिहिलेला हा निबंध माझ्या मनास रुचला असे सांगून गुरुनाथ फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे माध्यमातून खासदार रक्षा खडसे यांनी विद्यार्थ्याच्या कलागुणांना अधिक वाव मिळावा या उद्देशाने राबविलेला हा उपक्रम अत्यंत उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले .
पारितोषीक वितरण व प्रमाणपत्र वितरण समारंभ दि.१६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयात संपन्न झाला असून आज या पारितोषिक वितरणातंर्गत एकूण ६७ महाविद्यालयानी व ७८९१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता . हिंदी व इंग्रजी निबंधाच्या निकाला करिता एकूण २७ परीक्षकांनी काम पाहिले . तर या त स्वतः खा रक्षा खडसे यांनी ३७ महाविद्यालयांना देऊन परिक्षण केले होते . पारितोषीक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी आ. एकनाथराव खडसे तर प्रमुख अतिथी म्हणून खा. रक्षा खडसे, आ. संजय सावकारे, क.ब.चौ उमवि जळगावचे कुलगुरु पी.पी. पाटील, नगराध्यक्ष रमण भोळे, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक,पं.स.सभापती प्रिती पाटील, प्राचार्या मिनाक्षी वायकोळे, संचालक विष्णू चौधरी, संजय नाहाटा, नगरसेवक युवराज लोणारी, नगरसेवक प्रमोद नेमाडे, भाजपाचे शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, भाजयुमोचेे शहराध्यक्ष अनिकेत पाटील, सामाजिक कार्यकर्ते देवा वाणी, गोलू पाटील, गटनेते मुन्ना तेली, प्रा.डॉ.सुनील नेवे आदी मान्यवर उपस्थित होते.
व सहभाग प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ प्रथम रोख २ हजार रु व सहभाग प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ द्वितीय रोख २ हजार ५०० व सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

उर्वरित उद्याच्या अंकात….

Leave A Reply

Your email address will not be published.