अरुंद नव्हे रुंद केला रस्ता- रेल्वे विभाग

0

भुसावल –रेलवे स्थानकाच्या दक्षिण दिशेतील बसस्थानक रस्त्याची रूंदी कमी करुन रेल्वे प्रशासन रस्ते अरुंद करीत असल्याचे वृत्त विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले होते.याबाबत रेल्वे प्रशासनाने रेल्वे रस्ते अरुंद करीत असल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे प्रसिद्धी पत्रकांनव्ये कळविले आहे. बस स्थानक समोर रस्त्याची रुंदी जवळपास ९ ते१० मीटर होती.त्यात वाढ करून रेल्वे प्रशासनाने १३ मीटर केली आहे.त्यात २ फुटाचा फुटपाथ बनविण्यात येणार आहे.गोलाकार असलेला हा रस्ता सरळ करण्यात आला आहे असेही रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.