नूतन महाविद्यालयात आग लागल्याने कागदपत्रे जळून खाक

0

जळगाव :- नूतन मराठा महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाला पाहटे २ वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये परीक्षा विभागासह जुने रेकॉड रूम, लेडीज रेस्ट रूमला आग लागून जुने दस्ताऐवज, उत्तरपत्रिका आदी कागदपत्रे जळून खाक झाली आहेत.

नुतन मराठा महाविद्यालयाच्या परिक्षा विभागाला लागलेली आग ही शॉकसर्कीटमुळे लागल्याचा अंदाज प्राचार्य एल. पी. देशमुख यांनी वर्तविला आहे. परिक्षा विभागात असलेल्या कागदांना लागलेली आग अग्निशमन दलाच्या बंबाने आटोक्‍यात आणली. पंचनाम्यासाठी पोलिस याठिकाणी आले होते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.