कंटेनरने पादचारी तरुणास चिरडले

0

जळगाव :– भुसावळकडून पाळधीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने पादचारी तरुणास जोरदार धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शहरातील अजिंठा चौफुलीजवळील हॉटेल मानसजवळ आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी चौफलीजवळ रस्ता रोको केल्याने काही काळ तणावाचा वातावरण निर्माण झाले होते. कंटेनर चालकाला जमावाने एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात दिले आहे.

याबाबत सविस्तर असे कि, सालार नगरातील रहिवाशी गुफरान खान अजमल खान (वय 22) हा नेहमी प्रमाणे अयोध्यानगरातील दुचाकी होंडा शोरूममध्ये कामाला जात असताना हॉटेल मानस जवळ रस्ता क्रॉस करीत असताना भुसावळकडून पाळधीकडे भरधाव वेगाने जात असलेला कंटेनर ओडी (०२ एल. ४८२६)ने त्याला जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. यानंतर संतप्त जमावाने चालकास चांगले बदडून एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. गुफारान खान हा नशिराबाद जि.प. शाळेचे मुख्याध्यापक अजमलखान यांच्या मुलगा आहे. त्याच्या पश्‍चात दोन भाऊ आई वडील असा परिवार आहे. मृत गुफराने एमबीएचे शिक्षण घेतले होते. तो एस्टर होंडा या ठिकाणी सेल्स एक्‍सीकेटीव्ह म्हणून कामाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.