निलंबित एसटी कर्मचारी संतप्त; आगारप्रमुखांना घेराव घालत विचारला जाब (व्हिडीओ)

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

एसटी विभागाला शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यभरात बेमुदत संप सुरू आहे. लालपरीची सेवा पूर्ववत व्हावी यासाठी संप करणार्‍या  कर्मचार्‍यांना  सेवेत रुजू होण्याचे आवाहन करण्यात आले होते.

व्हिडीओ बातमी👇

याच दरम्यान कर्मचारी रुजू न झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली हाेती. अशाच प्रकारे जळगाव आगारातील काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.  निलंबित कर्मचाऱ्यांना आरोप पत्र दिल्यानंतर पंधरा दिवसाची मुदत न देता दुसऱ्याच दिवशी ६ डिसेंबर रोजी समक्ष सुनावणी लावण्यात आल्याचे सूचित करण्यात आल्याने निलंबित एसटी कर्मचारी संतप्त झाले.

एसटी प्रशासन नियमबाह्य भूमिका घेवून दडपशाही करत एसटी कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत निलंबित एसटी कर्मचाऱ्यांनी शनिवारी एसटी आगार प्रमुखांच्या दालनात आगार प्रमुखांना घेराव घालत याबाबत जाब विचारला.

यावेळी कर्मचाऱ्यांनी कार्यवाही कशा पध्दतीने चुकीचे आहे.  याबाबत आगारप्रमुखांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आगारप्रमुखांची भंबेरी उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.