निर्मल इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतली तहसिल कार्यालयाच्या कामकाजाची माहिती

0

पाचोरा(प्रतिनिधी) :-पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कुलच्या इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांनी पाचोरा तहसिल कार्यालयात येवून कार्यालयात चालत असलेल्या दैनंदिन कामकाजा विषयीची माहिती जावून घेतली. तहसिलदार कैलास चावडे यांनी कार्यालयात चालत असलेल्या विविध विभागाच्या  कामांची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी निवासी नायब तहसिलदार अमित भोईटे, नायब तहसिलदार उमाकांत कडनोर, निवडणूक नायब तहसिलदार संभाजी पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसिलदार उबाळे, अव्वल कारकुन विनोद कुमावत, संजय साळुंखे, शाळेचे शिक्षक मिनल मोरानकर, सलीम पिंजारी, नंदकुमार पाटील, सह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी तहसिलदार कैलास चावडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्यानंतर चावडे यांनी तहसिल कार्यालयात ७/१२ उतारा, खाते उतारा, जमिनिचा मालकी हक्क, कुळकायद्याची जमिन, निराधारासाठीच्या विविध प्रकारच्या योजना, निवडणूक शाखेत चालणाऱ्या कामकाजाची माहिती, उत्पनाचे दाखले, विविध प्रकारच्या जातींचे दाखले, तहसिल कार्यालयात जमा करावे लागणारे विविध प्रकारचे कर, आस्थापना विभाग, ग्राहकांसाठीचे कायदे, तलाठी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकुन, नायब तहसिलदार ते तहसिलदारा पर्यंतची कामे, तालुका दंड अधिकाऱ्यांची जबाबदारी, विविघ कामांसाठी करावे लागणारे प्रतिज्ञापत्र या विषयावर चर्चा केली. चर्चेत विद्यार्थी हेतल बांठिया, मंदार पाटील, देवांग पाटील यांनी सहभाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.