प्लॉटधारकाचे रस्त्यावरील अतिक्रमण थांबवा

0

पाळधी ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पाळधी- सार्वजनिक वापराचा रस्त्यावर बांधकाम करुन रस्ता बंद करणाऱ्या खाजगी प्लॉटधारकाचे बांधकाम थांबवा, अशी मागणी पाळधी खु. येथील ग्रामस्थ रहिवाशी, नागरीकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पाळधी खुर्द, भजे गल्ली, कोंबडीपुरा येथील गट नं. 22 येथे प्लॉटधारकाकडून आम्ही राहत असलेल्या ठिकाणी आमचा सि.स. नं. 402, 403, 404, 405 व इतर रहिवासी वडिलोपार्जित असून त्या जागेवर नवीन आमचे व गावाचे ग्रामदैवत मरीमाता मंदीर सदर रस्त्यावर असून सदरचा रस्ता वहीवाटनुसार 6 मीटर आहे. या रस्त्याशेजारी संबंधित प्लॉटधारक सत्तार वजीर खान प्लॉट 6 हे वहिवाट रस्त्यावर अतिक्रमण करुन हा रस्ता बंद करत असून याबाबत ग्रामपंचायतीत तक्रार केली आहे. या प्रकारामुळे गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. तरी सदर व्यक्तीचे बांधकाम करण्यास सुरुवात करण्याआधीच थांबवावे. वहिवाटप्रमाणे नागरिकांना रस्ता मिळावा, त्याच्या हद्दीत बांधकाम करण्याचे आमची हरकत नाही. भविष्यात आप्तकालीन परिस्थिती उद्भावल्यास आम्हास पर्यायी रस्ता नाही. त्यामुळे जीवीत हानीसारखा प्रकार उद्भवू नये, यासाठी तात्काळ अतिक्रमित बांधकाम थांबविण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.