जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला पाचोरा पालिकेकडुन केराची टोपली

0

– रस्ता काॅंन्क्रेटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे

– जनतेच्या लाखों रुपयांचा होत आहे चुराडा

– राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेद्वारे केला आरोप

पाचोरा (प्रतिनिधी) :-मागील काळात कमी दराने निवेदा मंजुर करणे, ९ . ९९ टक्के जादा दराने मक्तेदारास मंजुरी देणे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार दाखल करुन कामास स्थगिती मिळवली होती. व जिल्हाधिकारी यांनी संबंधित मक्तेदारांकडुन पैसे वसुल करण्याचे आदेश दिलेले असतांना पालिकेतील सत्ताधारी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी त्याच बाबींची पुनरावृत्ती करुन एक प्रकारे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असुन नविन होत असलेल्या काॅंन्क्रेटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे करुन जनेतेच्या लाखों रुपयांचा चुराडा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी माजी आमदार दिलीप वाघ यांचे निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करुन केला. यावेळी माजी आमदार दिलीप वाघ, न.पा. गटनेते संजय वाघ, नगरसेवक विकास पाटील, वासुदेव महाजन, भुषण वाघ, सुचेता वाघ, अशोक मोरे, रंजना भोसले, निलिमा पाटील, ए.बी. अहिरे, रणजित पाटील, शहर अध्यक्ष सतिष चौधरी उपस्थित होते.

पाचोरा शहरात भुयारी गटारींची मंजुरी येण्याच्या मार्गावर असतांनाच्या वेळी शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांचे काॅंन्क्रेटीकरण करण्यात आले होते. ५८ कोटी रुपयांच्या भुयारी गटारींसाठी शहरातील २०० कोटींचे रस्ते खोदण्यात आले. भुयारी गटारींच्या कामानंतर पुन्हा रस्त्यांचे काॅन्क्रेटीकरण करणे सुरू झाले आहे. यात इंदिरा नगर चौकापासुन दिलीप वाघ यांचे घरापर्यंत व पुनगांव रोड वरील एन. आर. ठाकरे यांच्या घरापासुन तर राजेश काळे यांचे घरापर्यंत अनुक्रमे ७२ लाख ३५ हजार १७७ रुपये व ३६ लाख २९ हजार ३१५ रुपये अशा किंमतीचे सर्वात कमी दराची निविदा दाखवुन सदरचे काम मंजुर केले. या कामासाठी प्राप्त झालेल्या चार निवेदांपैकी सर्वात कमी दराच्या निवेदेपेक्षा ९ . ९९ टक्के जादा दराने मक्तेदारास मंजुरी दिली आहे. निविदेची अंबलबजावणी करतांना कायदेशीर तरतुदी न पाळता पद व अधिकाराचा दुरुपयोग केला जात आहे. सदरचे काम होत असतांना एम – ३५ या काॅंन्क्रिंट प्रकाराचे असुन रेती, खडी, सिमेंट व स्टील हे योग्य प्रमाणात वापरले जात नाही. अंदाजपत्रकामध्ये जी. एस. टी. १२ टक्के समाविष्ट असतांना ९ . ९९ टक्के जादा दराने काम देण्याचे कारण काय ? पुर्वीचा रस्ता सात मीटरचा असतांना अंदाजपत्रकाच्या कारणाने तो ११ मीटरचा केला जात असुन वाढीव चार मीटरचा रस्ता केवळ मुरुम टाकुन वाढविला जात असुन त्यावरच काॅंन्क्रेटीकरण केले जात आहे. मागील काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार केल्यानंतर सदर कामास स्थगिती देण्यात आली होती. तरीही गतकाळात अशाच प्रकारच्या कामांची मंजुरी घेवुन निकृष्ट दर्जाचे काम करुन जनतेच्या लाखों रुपयांचा चुराडा सुरू असल्याचेही माजी आमदार दिलीप वाघ यांनी पत्रकारांना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.