कारगील विजय दिवस भाजयु मोर्चा पाचोरातर्फे उत्साहात साजरा

0

पाचोरा(प्रतिनिधी) :- भारतीय वीर जवानांच्या विराट शौर्य, साहस आणि पराक्रमाचे 20 वर्षपुर्ण झाले कारगिल विजय दिनानिमित्त माजी सैनिक कल्याण मंत्रालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने महाराष्ट्रातील अनेक चित्रपटघरात “उरी द सर्जिकल स्ट्राईक” हा चित्रपट मोफत दाखविण्यात आला. पाचोरा येथे प्रकाश टाँकीज येथे हा चित्रपट दाखविण्यात आला या प्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा पाचोरा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते. उपस्थित युवक व युवतींना कारगिल विजय दिनाच्या संदेश व भारतीय जवानांच्या बलीदानाचे महत्त्व मा. पाचोरा तहसिलदार कैलास चावडे साहेब यांनी मार्गदर्शन केले. भाजयुमो तर्फे भारतमाता पुजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वंसेवक संघाचे मनीषजी काबरा  एम.एम. महाविद्यालय, पाचोरा येथील प्राध्यापक वर्ग, तसेच भाजयुमो चे पदाधिकारी व कार्यकर्ते महाविद्यालीन युवक व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद शेलार यांच्या नेतृत्वाखाली ता.अध्यक्ष गणेश पाटील, शहर अध्यक्ष राजेंद्र कुमावत, भाजप शहर उपाध्यक्ष विरेंद्र चौधरी, भाजयुमोचे उपाध्यक्ष निंरजन पाटील, शकील पिंजारी यांनी मेहनत घेतली. विस्तारक विक्की देशमुख, भाजयुमो कार्यकर्ते नितीन तायडे, रामा जठार, ऋषी पाटील, दिपेश देवरे उपस्थित होते. कारगिल विजय दिना निमित्त भारतमातेच्या  वीर पुत्रांच्या शौर्य, साहस आणि सर्वोच्च बलिदानाला कोटी-कोटी नमन

Leave A Reply

Your email address will not be published.