निर्भया प्रकरणातील आरोपीची फाशी कायम; न्यायालयाने याचिका फेटाळली

0

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींपैकी एक असलेल्या अक्षयकुमार सिंह या आरोपीची पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणी केली. यावेळी न्यायालयाने आरोपीची पुनर्विचार याचिका फेटाळत त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. मात्र, आरोपी अक्षयने राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्यासाठी न्यायालयाकडे दोन आठवड्यांचा कालावधी मागितला. दरम्यान, या प्रकरणातील अन्य आरोपी मुकेश पवन गुप्ता, विनय शर्मा यांच्या फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने आधीच फेटाळल्या आहेत.

आरोपी कोणत्याही प्रकारच्या दयेसाठी पात्र नाहीत. त्यांना फाशीचीच शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने आरोपीची पुनर्विचार याचिका फेटाळत त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. मात्र, आरोपी अक्षयने राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्यासाठी न्यायालयाकडे दोन आठवड्यांचा कालावधी मागितला आहे. परंतु, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आरोपीच्या मागणीला विरोध केला आहे. याप्रकरणात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, निर्भया बलात्कार प्रकरणात चार आरोपींना फाशीची शिक्षा झाली होती. त्यातील अक्षय ठाकूर या आरोपीने सर्वोच्च न्यायालयात दया याचिका दाखल केली आहे. आरोपीच्या वकिलाला युक्तिवादासाठी केवळ 30 मिनिटांचा वेळ देण्यात आला. अशिलाविरोधात कोणताही पुरावा नसल्याचा दावा आरोपीच्या वकिलाने न्यायालयात केला. पुनर्विचार याचिका दाखल केलेल्या आरोपीच्या वकीलांनी या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यावेळी त्यांनी तुरूंग अधीक्षक सुनिल गुप्ता यांच्या पुस्तकाचा उल्लेखही करण्यात आला. यावेळी न्यायालयानंही यावर प्रतिक्रिया देत ट्रायल पूर्ण झाल्यानंतर यावर पुस्तक लिहिणं हा गंभीर ट्रेंड असल्याचं म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.