निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी देण्यापूर्वी दोषींच्या वकिलांचा जेलबाहेर प्रचंड ड्रामा ; काय घडले रात्री?

0

नवी दिल्लीः  देशाला हादरावून सोडणाऱ्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींना आज पहाटे साडेपाच वाजता एकच वेळी फासावर लटकवलं गेलं. दरम्यान, निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी देण्याच्या काही तासापूर्वी जेल आणि जेलबाहेर दोषींच्या वकिलांनी प्रचंड ड्रामा केला. फाशी टाळण्यासाठी वकिलांनी आटोकात प्रयत्न केला. तर दुसरीकडे निर्भयाची आई न्याय प्रणालीवर विश्वास ठेवून न्याय मिळवण्यासाठी लढा देत होती. अखेर विजय हा न्यायाचा झाला आणि 4 ही आरोपींना ठीक 5.30 वाजता फासावर लटकवण्यात आलं.

निर्भयाला ७ वर्षांनी न्याय मिळाला आहे. चारही दोषींना २० मार्च २०२० रोजी पहाटे 5.30 वाजता फाशी दिली गेली. फाशी देण्यापूर्वी मध्यरात्री 12 वाजून 48 मिनिटांनी दोषींच्या वकिलांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली.

दिल्ली कोर्ट ते फास….संपूर्ण घटनाक्रम

– मध्यरात्री रात्री 12 वाजून 48 मिनिटांनी
दिल्ली हायकोर्टाने याचिका फेटाळल्यावर मध्यरात्री 12.48 वाजता दोषींचे वकील ए.पी.सिंग यांनी सुप्रीम कोर्टाच्या रजिस्टार यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले.

– मध्यरात्री रात्री 1 वाजून 23 मिनिटं
सुप्रीम कोर्टाचे रजिस्टार यांची भेट निश्चित झाल्याचं आरोपींचे वकील ए पी सिंग यांनी सांगितलं.

– 1 वाजून 40 मिनिटांनी
आरोपींचे वकील ए पी सिंग हे सुप्रीम कोर्टाचे रजिस्टार यांच्या निवास स्थानी पोहोचले.

– 2 वाजून 04 मिनिटं
सुप्रीम कोर्टचे रजिस्टार यांची भेट झाल्यावर आरोपांचे वकील ए पी सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सुप्रीम कोर्टात फाशी रद्द करणे तसंच तत्काळ सुनावणी करता याचिका केली असून पहाटे 3 वाजता त्यावर सुनावणी असण्याची शक्यता आहे. कारण कोर्ट सुरू आहे, असं प्रसार माध्यमांना सांगितलं.

– 2 वाजून 13 मिनिटं
सुप्रीम कोर्टाने याचिका दाखल केली असून त्यावर पुढील 15 मिनिटात म्हणजे 2 वाजून 30 मिनिटांनी सुनावणी करणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केलं.

– 2 वाजून 26 मिनिटं
आरोपींचे वकील आणि निर्भयाचे आई-वडील सुप्रीम कोर्टात पोहोचले… “जोपर्यंत आरोपींना फाशी देणार नाही तोपर्यंत मी न्यायालयातून जाणार नाही” निर्भयाच्या आईने संताप व्यक्त केला.

 – 2 वाजून 48 मिनिटं
सुप्रीम कोर्टाचे साॅलिसिटर जनरल तुषार मेहता कोर्टात पोहचले. सुनावणीस सुरुवात

– 3 वाजून 8 मिनिटं
आरोपी पवनच्या वकिलांनी न्यायालयात पवनचे शाळेतील प्रमाणपत्र, शाळेचे रजिस्टर आणि पवनचा शाळेतील हजेरी

पट सादर करत पवन घटनेवेळेस अल्पवयीन होता. ही सर्व कागदपत्रे या आधी देखील न्यायालयात सादर करण्यात आल्याचे न्यायधिशांनी स्पष्ट केलं.

पहाटे 3 वाजून 10 मिनिटं

कोणत्या आधारावर तुम्ही याचिका दाखल केलीये, तुम्ही जे मुद्दे मांडताय यांवर न्यायालयात अनेकदा सुनावणी झालीये. न्यायाधीश भूषण यांनी आरोपींच्या वकीलांना प्रश्न केला.

मध्यरात्री 3 वाजून 14 मिनिटे

आरोपींनी फाशी होणार आहे हे माहितीये पण फाशी ३ दिवसांकरता टाळता येवू शकेल का? दोषी पवनचा जबाब नोंदवता येईल असा युक्तीवाद आरोपींचे वकील ए पी सिंग यांनी केला.

 3 वाजून 43 मिनिटं

आरोपी पवनची याचिका फेटाळत फाशी रद्द केली जावू शकत नाही हे सुप्रिम कोर्टाने स्पष्ट केलं.

 3 वाजून 45 मिनिटं

आरोपींची याचिका न्यायालयाने फेटाळली असून आरोपींना फाशी होणार यांवर निर्भयाच्या आईने समाधान व्यक्त करत“ ज्या घटनेमुळे देशाची मान खाली गेली होती, त्या प्रकरणात आज देशाला न्याय मिळालाय, आरोपींना फासावर लटकवले जाणार, मी सर्व देशवासियांचे, देशातील सर्व मुलींचे आणि महिलांचे आभार मानते अशी प्रतिक्रिया दिली

3 वाजून 48 मिनिटं

आरोपींना त्यांच्या परीवारास भेटण्याची परवानगी आरोपींचे वकील ए पी सिंग यांनी मागितली. यांत आम्ही हस्तक्षेप करु शकत नाही, साॅलिसिटर जनरल तुषार मेहता पाहतील असं न्यायाधीशांनी स्पष्ट केलं. त्यावर जेल प्रशासन याकरता परवानगी देत नसून दोन्ही पक्षाकरता हे दुःखदायक असल्याचे मत नोंदवलं.

पहाटे 4 वाजून 22 मिनिटं

जेलचा जल्लाद जेलमध्ये दाखल झाला. जेलच्या अधिका-यांची बैठक सुरू झाली

पहाटे 5 वाजून 10 मिनिटं

सर्व आरोपींना फाशीकरता आणण्यात आलं. तिहार जेलच्या बंदोबस्त लावला गेला

पहाटे 5 वाजून 30 मिनिटं

चारही आरोपींना फासावर लटकवलं

पहाटे 5 वाजून 58 मिनिटं

निर्भयाचा फोटो उराशी लावून “बेटा तूला आज न्याय मिळाला” अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.