बहुमत चाचणीपूर्वीच कमलनाथ देणार राजीनामा?

0

भोपाळ : मध्य प्रदेशात गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याची आज सांगता होण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेश विधानसभेचे विशेष  अधिवेशन बोलावून सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घ्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष एनपी प्रजापती यांनी १६ बंडखोर आमदारांचे राजीनामेही स्वीकारले आहेत. यापूर्वीही सहा आमदारांचे राजीनामे स्वीकारण्यात आले होते. त्यामुळे आता भाजपला याचा थेट फायदा होणार आहे.

दरम्यान, कमलनाथ पत्रकार परिषद घेणार आहेत. याचवेळी राजीनाम्याचीही घोषणा होण्याची शक्यता आहे. कमलनाथांकडे पुरेसं संख्याबळ नसल्याचं काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही मान्य केलं आहे. त्यामुळे काँग्रेसचं सरकार आणखी एका राज्यातून गेल्यात जमा आहे. २३० सदस्य संख्या असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेत आता २०६ सदस्य आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा १०४ वर आला आहे. आमदारांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडे आता ९२ आमदार (विधानसभा अध्यक्षांसह) उरले आहेत. अपक्ष ४, बसपा २ आणि सपा १ यांचं समर्थन मिळालं तरीही कमलनाथांकडे फक्त ९९ आमदार असतील. त्यामुळे बहुमतासाठी ५ आमदार कमी पडतील. दोन्ही पक्षांना समान मते मिळाल्याच्या स्थितीतच विधानसभा अध्यक्षांना मत देता येतं.

Leave A Reply

Your email address will not be published.