नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपा प्रशासनाची कारवाई

0
जळगाव, प्रतिनिधी – आयुक्त यांचे कार्यालयीन आदेश दिनांक 27/4/2020 अन्वये जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.
प्रभाग समिती क्रमांक 4 अंतर्गत कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क/ रुमाल वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे. इत्यादी बाबींचे उल्लंघन करणाऱ्या महाबळ कॉलनी, एम. जे. कॉलेज, गिरणा टाकी, एस.एम.आय.टी. परिसरातील विक्रेत्यांवर रक्कम रु ५००/- मात्र प्रति विक्रेत्यावर दंडाची आकारणी  करण्यात आलेली आहे. यात अनिल नर्सरी, चर्च रोड, प्रवीण पाटील, विकास दुग्धालय, डीएसपी चौक, विकास झोपे, विकास दुध, महाबळ रोड, जोशी फ्रुट सेंटर, मायादेवी नगर, शिव डेअरी, महाबळ रोड, प्रसाद प्रोव्हिजन, महाबळ रोड, अनिकेत चौधरी, दिशा नीड्स, सुशील किराणा, एस एम आय टी रोड, अग्रवाल मेडिकल, एसएमआयटी यांचा समावेश आहे.
सदरची कारवाई प्रभाग अधिकारी उदय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता निरीक्षक उल्हास बेंडाळे, सुनील भट ,चेतन हातागळे, मुकादम दीपक भावसार, वालीदास सोनवणे, इमरान भिस्ती, शंकर अंभोरे, विशाल हातागळे, इत्यादी यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.