निमखेड येथील गावठी दारू विक्रेत्यांवर पोलीसांची कारवाई

0

बोदवड – तालुक्यातील निमखेड येथील गावठी हात भट्टी दारू विक्रेत्यांवर पोलीसांनी कारवाई केली. या कारवाईत ४५० रुपये किंमतीची १० लिटर गावठी हात भट्टी दारू पोलीसांनी जप्त केली आहे.

निमखेड गावी रामदास सदाशिव वाघ (वय-३९ रा.निमखेड ता.बोदवड)नामक व्यक्ती एका लाकडी टपरीच्या आडोशाला निमखेडगावी गावठी हात भट्टी दारू बेकायदेशीररित्या विक्री करीत असतांना बोदवड पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याविरुद्ध कारवाई केली.

याप्रकरणी सहाय्यक फौजदार दिपक नाना पाटील यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम ६५ (ई) कायद्यान्वये गु.रं.न.१६३/२०१९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील खरे आदेशान्वये सहाय्यक फौजदार विजेश पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.