जिल्ह्यातील सहकारी संस्थांना अल्टिमेट !

0

३१ डिसेंबरपर्यंत ऑडिट न करणाऱ्या संस्था अवसायनात काढणार !

जळगाव : जिल्ह्यातील सहकारी संस्थांना अल्टिमेट देण्यात आला आहे. येत्या ३१ डिसेंबर २०१९ अखेर ज्या सहकारी संस्था ऑडिट करणार नाहीत त्या संस्थांवर अवसायनाची कारवाई करणार असल्याचा इशारा सहकारी संस्थांचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक आर.बी. जंगले यांनी दिला आहे.

याबाबत माहिती अशी कि जळगाव जिल्ह्यातील लेखापरीक्षणास पात्र एकूण २९१२  इतकी संस्था आहे. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाचे कलमानुसार प्रत्येक सहकारी संस्थेने वित्तीय वर्षात एक वेळा तरी लेख्यांची लेखापरीक्षा करणे अनिवार्य आहे. लेखापरीक्षण आर्थिक वर्ष संपल्यापासून चार महिन्याचा आत म्हजेच ३१ जुलै पर्यंत पूर्ण होणे बंधनकारक आहे. त्याच प्रमाणे संस्थेचा लेखापरीक्षण अहवाल, लेखापरीक्षण पूर्ण झाल्यापासून १ महिन्याचा कालावधीच्या आत कोणत्याही परिस्थितीत वार्षिक साधारण सभेच्या बैठकीची नोटीस निर्गमनापूर्वी संस्थेला व निबंधकांना सादर करणे अनिवार्य आहे. तथापि जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग १ सहकारी संस्था जळगाव यांच्या कार्यालयात नोव्हेबंर २०१९ पर्यंत २२२३ संस्थांचे लेखापरीक्षण पूर्ण होऊन तसा अहवाल प्राप्त झालेला आहे. त्यामुळे डिसेंबर २०१९ अखेर ज्या सहकारी संस्था ऑडिट करणार नाहीत त्या संस्थांवर अवसायनाची कारवाई करणार असल्याचा इशारा सहकारी संस्थांचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक आर.बी. जंगले यांनी  दिला आहे तसं पत्रक शुक्रवारी काढण्यात आलेला आहे

 

Leave A Reply

Your email address will not be published.